'पुष्पा नाम है मेरा झुकेगा नही साला' असं म्हणणारा सुपरस्टार अल्लू अर्जुनला (Allu Arjun) विमानतळावर सीआयएसएफ अधिकाऱ्याने मात्र झुकवलंच. अल्लू अर्जुन नुकतंच मुंबई विमानतळावर आला. तिथे सुरक्षा अधिकाऱ्यासमोरुन तो मास्क लावून आतमध्ये जात होता. तेव्हा अधिकाऱ्याने त्याला थांबवलं. दोन वेळा सांगूनही तो मास्क काढायला तयार नव्हता. मात्र अधिकाऱ्याने त्याला शेवटपर्यंत जाऊ दिलं नाही. अखेर त्याला त्याचा चेहरा दाखवावा लागलाच. 'पुष्पा'सोबत नक्की काय घडलं पाहा.
अल्लू अर्जुनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुंबई विमानतळावर तो आला असता गेटवरच सुरक्षारक्षकाने त्याला अडवलं. त्याच्यासोबत त्याची टीमही होती. आयडी कार्ड दाखवल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्याने अल्लू अर्जुनला मास्क काढायला सांगितला. अल्लूने नकार दिला. तेव्हा त्याच्या टीमने हा अल्लू अर्जुन आहे असं सांगितलं. तरीही सुरक्षा अधिकारी ऐकत नव्हता. त्याने 'पुष्पा'ला झुकवलंच आणि मास्क काढायला सांगितला. अल्लूने १ सेकंदासाठी मास्क खाली केला आणि पुन्हा लगेच लावला. मगच त्याला आतमध्ये जाता आलं. अल्लूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नेटकऱ्यांनी अल्लू अर्जुनला कमेंट्समध्ये चांगलंच सुनावलं आहे. 'तू काय स्वत:ला देव समजतोस का?', 'पूर्ण चेहरा दाखव ना, एवढा काय अहंकार आहे?, 'काही वेड्या चाहत्यांमुळे हे लोक स्वत:ला देव समजायला लागतात आणि नियमांचं पालन करत नाही', 'सीआयएसएफ अधिकाऱ्याचा हा अधिकार आहे', 'पुष्पा झुक या, इधर झुकना ही पडेगा'.
अॅटलीच्या आगामी 'AA22XA6' सिनेमात अल्लू अर्जुन दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत दीपिका पादुकोणही आहे.