Join us

पुष्पाचा लेक धावत आला तर पत्नी मिठी मारून रडली, तुरुंगातून घरी आल्यानंतर अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांचा भावुक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:19 IST

अल्लू अर्जुनची सुटका होताच पत्नीला अश्रू अनावर, मिठी मारुन ढसाढसा रडली, भावुक करणारा व्हिडिओ

Allu Arjun Arrest : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी (१३ डिसेंबर) पोलिसांनी अटक केली. 'पुष्पा २'च्या स्क्रिनिंगदरम्यान हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनलाअटक केली होती. त्यानंतर अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. संपूर्ण रात्र तुरुंगात काढल्यानंतर आज सकाळी अल्लू अर्जुनची सुटका करण्यात आली. 

तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सुटका झाल्यानंतर अल्लू अर्जुन त्याच्या घरी गेला. वडिलांना पाहताच अल्लू अर्जुनचा मुलगा धावत त्याच्या जवळ येत असल्याचं दिसत आहे. तर त्याला पाहताच त्याची पत्नी भावुक झाली. अल्लू अर्जुनला पाहताच तिला अश्रू अनावर झाले. अल्लू अर्जुनला मिठी मारत नेहा रडत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. अल्लू अर्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांचा हा भावुक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

अल्लू अर्जुनची साऊथमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यातच त्याच्या 'पुष्पा' सिनेमाचा भलामोठा चाहतावर्ग आहे. साऊथमध्ये अनेक ठिकाणी सिनेमाच्या टीमने जोरदार प्रमोशन केलं होतं. ५ डिसेंबरला 'पुष्पा २' रिलीज झाला. त्याच्या आदल्या दिवशी हैदराबाद येथील संध्या थिएटमध्ये सिनेमाचा प्रीमियर झाला होता. यावेळी एक दुर्घटना घडली. दिलसुखनगर येथे राहणारी महिला रेवती तिचे पती भास्कर आणि दोन मुलं श्रीतेज (९) आणि संविका (७) यांच्यासोबत 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला उपस्थित होती. प्रिमियरच्या वेळेस गर्दीत असलेल्या लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ झालं. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने यात रेवती आणि तिचा मुलगा श्रीतेज बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाअटक