Join us

69th National Film Award: झुकेगा नहीं! राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा अल्लू अर्जुन पहिला तेलुगु अभिनेता, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 19:36 IST

National Film Award: ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने नाव कोरलं.

मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी (२४ जुलै) या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट, अभिनेता आणि अभिनेत्री यांची लिस्ट समोर आली आहे. ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा डंका पाहायला मिळत आहे.

६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने नाव कोरलं. ‘पुष्पा’ या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारावर नाव कोरुन अल्लू अर्जुनने एक विक्रम रचला आहे. राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा अल्लू अर्जुन पहिला तेलुगु अभिनेता ठरला आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्मात्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. याबरोबरच प्रेक्षकांचेही आभार मानतो.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. तर चित्रपटातील संवादही प्रचंड हिट झाले होते. ‘पुष्पा’च्या यशानंतर आता या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक समोर आला होता. ‘पुष्पा २’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आलिया भट्टला ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि क्रिती सेनॉनला ‘मिमी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरविण्याच आलं. तर आर.माधवनच्या रॉकेट्रीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड मिळाला. पल्लवी जोशी आणि पंकज त्रिपाठी यांना सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

टॅग्स :अल्लू अर्जुनराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018पुष्पा