Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं टक्कल, अनेकांच्या भुवया उंचावल्या; खरं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 16:08 IST

मनोरंजनक्षेत्रात अभिनेत्री त्यांच्या लूकबाबतीत खूप सजग असतात.

मनोरंजनक्षेत्रात अभिनेत्री त्यांच्या लूकबाबतीत खूप सजग असतात. फॅशन, हेअरस्टाईल, मेकअप या सगळ्याच बाबतीत त्या जागरुक असतात. अशा परिस्थितीत कोणी पूर्ण टक्कल करणं म्हणजे खूपच आव्हानात्मक निर्णय आहे. सध्या एक अभिनेत्री चर्चेत आहे जिने पूर्ण टक्कल केले आहे. तिने बाल्ड लूक केल्याने सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

या अभिनेत्रीचं नाव आहे सुरेखा वाणी (Surekha Vani). 46 वर्षीय सुरेखाने नुकतंच बाल्ड लूकमधील फोटो पोस्ट केला आहे. तिचा असा लूक पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र तिने हे कोणत्या प्रोजेक्टसाठी केले आहे का यामागचं नक्की काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. आपले सुंदर लांब केस कापून तिने हा लूक का केला याचं कारण आता समोर आलं आहे.

अभिनेत्री सुरेखाने नुकतंच तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. तिथे आपले केस दान करायची प्रथा आहे. ज्यांची इच्छा असेल ते केस दान करु शकतात. तिरुपती बालाजी मंदिरात श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत जे स्वयं विष्णुचा अवतार आहेत त्यामुळे तिथे केस दान करण्याची प्रथा आहे. 

टॅग्स :Tollywoodसोशल मीडियाव्हायरल फोटोज्