Join us

छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार

By ऋचा वझे | Updated: April 29, 2025 13:59 IST

अभिनेत्रीने बॉलिवूडमधील दोन गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता ती दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता, सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda)सध्या त्याचा आगामी चित्रपट 'किंगडम'मुळे चर्चेत आहे. त्याचा हा बहुचर्चित चित्रपट तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ज्युनिअर एनटीआने तेलुगू, रणबीर कपूरने हिंदी तर अभिनेता सूर्याने तमिळ सिनेमाच्या टीझरसाठी आवाज दिला आहे. उद्या सिनेमाचा प्रोमो रिलीज होणार आहे. दरम्यान सिनेमात विजयची हिरोईन कोण असणार हेही आता समोर आले आहे. ही अभिनेत्री छत्रपती संभाजीनगरची असून मराठी कुटुंबात जन्माला आली आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

बोरसेंची भाग्यश्री बनली विजय देवरकोंडाची हिरोईन!

विजय देवरकोंडासोबत 'किंगडम'मध्ये झळकणारी ही अभिनेत्री आहे भाग्यश्री बोरसे (Bhagyashri Borse). भाग्यश्रीचा जन्म १९९९ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. भाग्यश्रीच्या जन्मानंतर काही वर्षात तिचं कुटुंब नायजेरियाला शिफ्ट झालं. तिथे तिच्या वडिलांना चांगली नोकरी मिळाली. नायजेरियातील 'लेगोज'शहरात तिने शालेय शिक्षण घेतलं. सात वर्ष नायजेरियात राहिल्यानंतर ती मुंबईत आली. इथे तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. शिक्षण घेतानाच ती मॉडेलिंगही करत होती. तिचा कॅमेरा प्रेझेन्स चांगला असल्याने अनेकांनी तिला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. भाग्यश्रीने काही जाहिरातींमध्ये काम केलं. नंतर ती बॉलिवूडमध्ये आली. भाग्यश्रीने 'यारियां' आणि 'चंदू चॅम्पियन' मध्ये काम केलं आहे. 

हिंदीत नशीब आजमावल्यानंतर भाग्यश्री साऊथमध्ये शिफ्ट झाली. गेल्या वर्षीच ती रवी तेजासोबत 'मिस्टर बच्चन' सिनेमात झळकली.  लवकरच तिचा 'कांता' सिनेमा येणार आहे ज्यामध्ये ती दुलकर सलमानसोबत दिसणार आहे.  भाग्यश्रीच्या वडिलांना सिनेमांचं वेड आहे. वडिलांसोबत बसून तिने राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांचे सिनेमे पाहिले आहेत. तेव्हापासूनच तिला सिनेमाविषयी आकर्षण होतं. आता 'किंगडम'मध्ये भाग्यश्रीला पाहण्याची चाहत्यांचा उत्सुकता आहे. पुढील महिन्यात 'किंगडम' रिलीज होणार आहे. सध्या भाग्यश्री नवी नॅशनल क्रश म्हणून उदयास येत आहे. 

टॅग्स :विजय देवरकोंडाTollywoodमराठीछत्रपती संभाजीनगर