दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) 'किंगडम' (Kingdom) सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमातील विजयच्या लूकची, अॅक्शन सीन्सची आणि एकंदर सिनेमाच्या कथेची जोरदार चर्चा आहे. सिनेमात विजयसोबत झळकलेली अभिनेत्री कोण माहितीये का? ही अभिनेत्री छत्रपती संभाजीनगरची असून आता थेट विजयची नायिका म्हणून 'किंगडम'मध्ये झळकत आहे. कोण आहे ही?
विजय देवरकोंडाच्या 'किंगडम' मध्ये दिसणारी ही अभिनेत्री आहे भाग्यश्री बोरसे (Bhagyashri Borse). भाग्यश्रीचा जन्म १९९९ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. भाग्यश्रीच्या जन्मानंतर काही वर्षात तिचं कुटुंब नायजेरियाला शिफ्ट झालं. तिथे तिच्या वडिलांना चांगली नोकरी मिळाली. नायजेरियातील 'लेगोज'शहरात तिने शालेय शिक्षण घेतलं. सात वर्ष नायजेरियात राहिल्यानंतर ती मुंबईत आली. इथे तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. शिक्षण घेतानाच ती मॉडेलिंगही करत होती. तिचा कॅमेरा प्रेझेन्स चांगला असल्याने अनेकांनी तिला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. भाग्यश्रीने काही जाहिरातींमध्ये काम केलं. नंतर ती बॉलिवूडमध्ये आली. भाग्यश्रीने 'यारियां' आणि कार्तिक आर्यनच्या'चंदू चॅम्पियन' मध्ये काम केलं आहे.
हिंदीत नशीब आजमावल्यानंतर भाग्यश्री साऊथमध्ये शिफ्ट झाली. गेल्या वर्षीच ती रवी तेजासोबत 'मिस्टर बच्चन' सिनेमात झळकली. लवकरच तिचा 'कांता' सिनेमा येणार आहे ज्यामध्ये ती दुलकर सलमानसोबत दिसणार आहे. भाग्यश्रीच्या वडिलांना सिनेमांचं वेड आहे. वडिलांसोबत बसून तिने राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांचे सिनेमे पाहिले आहेत. तेव्हापासूनच तिला सिनेमाविषयी आकर्षण होतं. आता 'किंगडम'मध्ये भाग्यश्रीला पाहण्याची चाहत्यांचा उत्सुकता आहे. सध्या भाग्यश्री नवी नॅशनल क्रश म्हणून उदयास येत आहे.
भाग्यश्रीचे इन्स्टाग्रामवर १.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. सिनेमात विजय आणि भाग्यश्रीची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर अनेकांनी भाग्यश्रीला रश्मिकाची कॉपी म्हटलं आहे. रश्मिका आणि भाग्यश्रीच्या दिसण्यात खूप साम्य आहे. भाग्यश्री आणि विजयचा किसींग सीनही व्हायरल होत आहे. भाग्यश्री फक्त २६ वर्षांची आहे. विजय आणि तिच्यामध्ये १० वर्षांचं अंतर आहे. 'किंगडम' उद्या ३१ जुलै रोजी रिलीज होत आहे.