Join us

बिग बजेट सिनेमांचं प्रदर्शन पुढे गेलं तरीही 'पुष्पा 2' समोर रिलीज होणार 'हा' सिनेमा, सर्वांना उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 17:49 IST

'पुष्पा 2'ला आव्हान द्यायला येतोय साऊथचा हा सिनेमा. जाणून घ्या त्याबद्दल

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा रिलीज व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत.  'पुष्पा 2' या बहुचर्चित सिनेमापुढे सिनेमे रिलीज करायला कोणीही पुढे धजावलं नाही.  'पुष्पा 2'मुळे अनेक सिनेमांची रिलीज डेट पुढे गेली आहे. अशातच  'पुष्पा 2'ला न घाबरता साऊथचाच एक सिनेमा त्याच दिवशी रिलीज होतोय त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जाणून घ्या.

'पुष्पा 2'समोर रिलीज होणार हा सिनेमा

अल्लू अर्जुनच्या  'पुष्पा 2'समोर साऊथचा 'मिस यू' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ प्रमुख भूमिकेत आहे. 'मिस यू' सिनेमाच्या टीमने याविषयी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल सर्वांना माहिती दिली. 'मिस यू' सिनेमाच्या मेकर्सना पुष्पा 2 समोर सिनेमा रिलीज करायची भिती वाटतेय का? असं विचारताच सिद्धार्थ म्हणाला की, "आम्ही का काळजी करु? काळजी तर पुष्पा 2 च्या मेकर्सना वाटली पाहिजे."

सिद्धार्थ याच पत्रकार परिषदेत पुढे म्हणाला की, "आम्हाला काळजीचं काही कारण नाही कारण आमचा सिनेमा चांगला सिनेमा असेल तर प्रेक्षक सिनेमा पाहायला आवर्जून येतील. त्यांना कोणी अडवू शकत नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात सर्वांना माहितीये की काय चांगलं अन् काय वाईट. मला माझ्या सिनेमावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे 'पुष्पा 2'चा सिनेमावर कोणताही परिणाम होणार नाही, याचा मला विश्वास आहे." 'मिस यू' सिनेमा 'पुष्पा 2' च्या आधी अर्थात २९ नोव्हेंबरला रिलीज होतोय.

 

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पा