बंगालमधील प्रसिद्ध अभिनेता राहुल बॅनर्जी याच्या अकस्मात निधनाने सर्वांना धक्का बसला. तो ४३ वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार राहुल ओडिशामधील तालसरी येथे शूटिंग करत होता. त्यावेळी तो समुद्रात उतरला. तसेच अचानक पाण्यात बुडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या तंत्रज्ञांनी त्याला बाहेर काढले आणि त्वरित रुग्णालयात नेले. मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाही. आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर राहुलची सोशल मीडियावरची शेवटची पोस्ट व्हायरल झाली आहे.
दिवंगत अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जीने त्याच्या निधनाच्या एक दिवस आधी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुलच्या इन्स्टाग्राम हँडलवर ४० हजारांहून अधिक फॉलोअर्स आणि एक हजाराहून अधिक पोस्ट आहेत. त्याच्या अकाऊंटवरील शेवटची पोस्ट नुकतीच समोर आली आहे. या पोस्टमध्ये राहुल आणि 'सहज कथा' या दोघांनी एकमेकांना कोलॅब केलं आहे. 'सहज कथा' हा राहुल यांचा स्वतःचा पॉडकास्ट शो होता. या क्लिपमध्ये राहुल हे अभिनेते आणि राजकारणी ब्रत्या बासू यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.
इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओमध्ये राहुल हे ब्रत्या बासू यांना विचारताना दिसतात की, "वेगवेगळ्या लोकांकडून आमंत्रण मिळूनही तुम्ही थिएटर परफॉर्मन्समध्ये सहभागी होण्यास नकार का देता?" जेव्हा ब्रत्या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देतात, तेव्हा राहुल त्यांचं म्हणणं अत्यंत लक्षपूर्वक ऐकतो स्वतःचं मतही मांडतात. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने प्रेक्षकांना यूट्यूबवर या मुलाखतीचा पूर्ण भाग पाहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, बंगाली अभिनेता राहुल यांनी त्यांच्या निधनाच्या चार दिवस आधी म्हणजेच २५ मार्च रोजी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो देखील पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये ते आपल्या सहकारी कलाकारांसोबत आनंदी वातावरणात दिसत होते. एकूणच सर्व काही छान सुरु असताना राहुलच्या या निधनाने त्यांचं कुटुंब आणि मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
Web Summary : Bengali actor Rahul Banerjee passed away while shooting in Odisha. His last Instagram post, featuring a podcast collaboration, has gone viral, leaving fans in mourning. He was 43.
Web Summary : बंगाली अभिनेता राहुल बनर्जी का ओडिशा में शूटिंग के दौरान निधन हो गया। उनका आखिरी इंस्टाग्राम पोस्ट, जिसमें एक पॉडकास्ट सहयोग था, वायरल हो गया है, जिससे प्रशंसक शोक में हैं। वह 43 वर्ष के थे।