दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या 'डकैत' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली आहे. 'डकैत'नं अवघ्या तीन दिवसांत जगभरात ४० कोटींहून अधिक कमाई केली आहे. याच यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमात मृणालवर कौतुकाचा वर्षाव झाला. या कार्यक्रमात प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मृणाल ठाकूरचं कौतुक करत तिला लग्नाबद्दल एक खास सल्ला दिला.
अल्लू अरविंद (अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील) यांनी मृणालला लग्नावरून एक मिश्किल सल्ला दिला. ते म्हणाले, "माझी अशी इच्छा आहे की, तू तेलगू सिनेसृष्टीतील कोणाशी तरी लग्न करावे आणि इथेच स्थायिक व्हावे. तुला आमच्या जवळ ठेवण्याचा हाच एक सोपा मार्ग आहे". अल्लू अरविंद यांचा हा सल्ला ऐकून मृणाल लाजली आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
या कार्यक्रमात 'कल्की २८९८ एडी'चे दिग्दर्शक नाग अश्विन मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. मृणालच्या अभिनयाबद्दल बोलताना ते म्हणाले, "मृणाल, तू एक अप्रतिम अभिनेत्री आहेस. ज्या ताकदीने तू गंभीर आणि दुःखद छटा असलेल्या भूमिका साकारतेस, ते पाहून मला मधुबाला आणि स्मिता पाटील यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींची आठवण येते. सध्याच्या काळात तुझ्यासारख्या मोजक्याच अभिनेत्री उरल्या आहेत, त्यामुळे तू चांगल्या संहितांची निवड करत राहा".
मराठी मुलगी ते लोकप्रिय अभिनेत्रीमृणाल ठाकूरचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. २०१२ मध्ये छोट्या पडद्यावरून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणालने मराठी चित्रपटांतून स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यानंतर हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' मधून तिला बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळाली. मात्र, 'सीता रामम्' या चित्रपटाने तिचे नशीब पूर्णपणे बदलले. 'हाय नन्ना' आणि आता 'डकैत' या चित्रपटांच्या यशामुळे ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.
Web Summary : Mrunal Thakur's film 'Dakait' success celebrated. Allu Arjun's father jokingly suggested she marry someone from the Telugu film industry. Director Nag Ashwin compared her to Madhubala and Smita Patil.
Web Summary : मृणाल ठाकुर की फिल्म 'डकैत' की सफलता का जश्न मनाया गया। अल्लू अर्जुन के पिता ने मजाक में सुझाव दिया कि वह तेलुगु फिल्म उद्योग के किसी व्यक्ति से शादी कर लें। निर्देशक नाग अश्विन ने उनकी तुलना मधुबाला और स्मिता पाटिल से की।