साउथ सुपरस्टार अजित कुमार यांचा भीषण अपघात झालाय. दुबईमध्ये २४ तासांच्या कार रेसिंगची तयारी करताना अजित कुमार यांचा अपघात झालाय. सोशल मीडियावर अजित कुमार यांच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तो व्हिडीओ पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसलाय. मीडिया रिपोर्टनुसार अजित कुमार या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.
अजित कुमार यांचा भीषण अपघात
अजित कुमार हे २४H दुबई २०२५ कार रेसिंगमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत होते. रेसिंगच्या आधी अजित यांनी रेस ट्रॅकवर प्रॅक्टिसही केली. याच प्रॅक्टिस सेशन दरम्यान अजित कुमार यांच्या कारचा भीषण अपघात झाला. समोर आलेल्या व्हिडीओनुसार सरळ चालत असलेल्या रेसिंग कारचं अचानक नियंत्रण सुटल्याने हवेत उडून ती मागच्या दिशेने प्रचंड वेगात गोल फिरली. त्यामुळे कारच्या काही भागाचं प्रचंड नुकसान झालं. उपस्थित लोकांनी वेळीच अजित कुमार यांना कारमधून बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
कारचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर अजित कुमार यांच्या अपघाताचा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहताच अजित कुमार यांच्या चाहत्यांना काळजी वाटली. सध्या तरी अजित कुमार यांच्या प्रकृतीबद्दल किंवा त्यांना झालेल्या दुखापतीबद्दल त्यांच्या टीमने कोणतीही माहिती सांगितली नाही. अजित कुमार यांचा रेसिंगची आवड आहे. त्यामुळेच 24H दुबई 2025 रेस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते गेले होते.