चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींचे वैयक्तिक जीवन नेहमीच 'टॉक ऑफ द टाउन' राहिले आहे. कोण कोणाला डेट करतेय, कोण कोणाशी लग्न करतेय आणि अगदी ब्रेकअप-घटस्फोट या गोष्टी कोणापासूनही लपलेल्या नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. ही अभिनेत्री लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट झाली होती. आता ही अभिनेत्री लग्नाच्या ८ वर्षानंतर पतीपासून घटस्फोट घेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री घटस्फोट घेणार अशी चर्चा होती. अखेर यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. अभिनेत्रीकडून कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दक्षिण कोरियाच्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ली सी यंग (Lee Si-young) आहे. ली सी यंग हिला 'स्वीट होम' ड्रामामधून मोठी लोकप्रियता मिळाली होती.
४२ वर्षीय ली सी यंग तिच्या व्यावसायिक पती चो सेओंग ह्युनपासून विभक्त झाली आहे. दोघांनीही या वर्षाच्या सुरुवातीला फॅमिली कोर्टात घटस्फोटाशी संबंधित कागदपत्रे सादर केली होती. आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. कोरियन अभिनेत्रीची एजन्सी एस फॅक्टरीने घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एजन्सीने म्हटलं आहे की, "ते परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. हे अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य आहे. सर्वांनी सहकार्य करावं. इतर कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणे सध्या कठीण आहे".
दक्षिण कोरियातील उद्योगपती चो सेओंगसोबत वर्षानुवर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ली सी यंगने जुलै २०१७ मध्ये लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी ती गर्भवती होती. दोघांनी सप्टेंबर २०१७ मध्ये लग्न केले आणि जानेवारी २०१८ मध्ये अभिनेत्री एका मुलाची आई बनली. दोघांनाही दक्षिण कोरियाच्या उद्योगातील पॉवर कपल म्हटलं जायचं. पण आता ते वेगळे झाले आहेत.
ली सी यंगबद्दल बोलायचं झालं तर, तिची गणना दक्षिण कोरियाच्या चित्रपट उद्योगातील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिने २००८ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. वाइल्ड रोमान्स, फाइव्ह सेन्सेस ऑफ इरॉस, लव्हिंग यू अ थाउजंड टाईम्स आणि स्वीट होम मधून ती लोकप्रिय झाली. ती एक बॉक्सर देखील राहिली आहे. बॉक्सिंग हा त्याचा छंद होता. तिने बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेत अनेक पदके जिंकली आहेत.