Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीच्या प्रेमात वेडी आहे 'ही' साऊथ अभिनेत्री, म्हणाली, "मी त्याचे फोटो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 13:32 IST

एक दाक्षिणात्य अभिनेत्री विराटची कमालीची चाहती आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात चाहते आहेत. त्याच्या उत्कृष्ट खेळाने तर भारतीयांचं मन जिंकलंच आहे. मात्र त्याच्या गुड लूक्समुळे तो तरुणींमध्येही खूप लोकप्रिय आहे. अनेक मुली त्याच्यावर फिदा आहेत. त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये अभिनेत्रीही काही कमी नाहीत. आलिया भटपासून ते कतरिना कैफ कित्येक अभिनेत्रींनी आवडत्या क्रिकेटर्समध्ये विराटचंच नाव घेतलं आहे. दरम्यान एक दाक्षिणात्य अभिनेत्री त्याची कमालीची चाहती आहे. विराटच्या प्रेमाखातर तिला क्रिकेटमध्येही रस निर्माण झाला आहे. कोण आहे ती अभिनेत्री?

विराट कोहलीवर जीव ओवाळून टाकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे साऊथ अभिनेत्री वर्षा बोलम्मा (Varsha Bollamma). वर्षाने बऱ्यादा विराटवरचं प्रेम जाहीररित्या व्यक्त केलं आहे. 2022 साली प्रदर्शित झालेल्या स्वाती मुथ्थम सिनेमात वर्षाने भूमिका साकारली होती. विराट  तिचा क्रश असल्याचं तिने अनेकदा मुलाखतींमधून सांगितलं आहे. ती लहानपणापासूनच विराटची पेपरमधील फोटो काढून ठेवायची. तसंच वर्षाला आधी क्रिकेटमध्ये काहीच रस नव्हता. तिला त्यातलं काही कळतंही नव्हतं. मात्र विराटवरील प्रेमामुळेच तिला आता क्रिकेटचीही आवड आहे. शिवाय विराटमुळेच आयपीएल(IPL) मध्ये तिची आवडती टीम' रॉयल चॅलेंजर्स बँगलोर'(RCB) ही आहे. वर्षाने अॅटली दिग्दर्शित 'बिगिल' सिनेमात एका महिला फुटबॉलपटूची भूमिका साकारली होती. यामध्ये तिचा जर्सी क्रमांकही १८ च घेतला होता. यावरुन तिने विराटवरचं तिचं प्रेम सिद्ध केलं होतं. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 300 कोटी रुपयांची कमाई केली.

वर्षा बोलम्मा सौंदर्यातही भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देते. तिची साऊथमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. 2015 साली तिने तमिळ सिनेमा 'सथुरन'मधून पदार्पण केले होते. यानंतर तिने विजय सेतुपति, त्रिशा यांच्यासोबत 96 सिनेमात काम केले. यामध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. वर्षा २७ वर्षांची असून तमिळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम करत आहे. डबस्मॅश व्हिडिओमुळे तिला जास्त लोकप्रियता मिळाली. 

टॅग्स :विराट कोहलीTollywoodसेलिब्रिटी