Dostana 2 Movie: धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला २००८ साली आलेला 'दोस्ताना' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. प्रियंका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन या कलाकारांची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमातून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला होता. जवळपास १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लवकरच दोस्ताना सीक्वल रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहे. आता बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'दोस्ताना २' ची घोषणा झाल्यानंतर चित्रपटात कोणते कलाकार दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. त्यानंतर सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरच्या नावाची चर्चा होती. मात्र, काही वैयक्तिक गोष्टींमुळे कार्तिकने सिनेमातून माघार घेतली. त्यानंतर दोस्ताना २च्या कास्टिंगबद्दल सात्यत्याने बदल होताना दिसत आहेत.
दरम्यान, 'दोस्ताना २' चित्रपटाचं शूट लक्ष्य, कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत सुरु झालं होतं. मात्र, कार्तिकच्या एक्झिटनंतर अभिनेता विक्रांत मेस्सीच्या पदरी ही भूमिका आली. आता या प्रोजेक्टमध्ये एका आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जाते आहे. धर्मा प्रॉडक्शनला दोस्ताना २ साठी मुख्य अभिनेत्री सापडली आहे. व्हरायटी इंडियाच्या एका विशेष अहवालानुसार, लक्ष्या आणि विक्रांत मेस्सी यांच्यासोबत रोमँटिक कॉमेडीमध्ये मिस इंडिया वर्ल्ड सिनी शेट्टीला फायनल करण्यात आलं आहे. त्यामुळे जान्हवी कपूरचा पत्ता कट झाल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरू लागल्या आहेत. दरम्यान,याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
कोण आहे सिनी शेट्टी?
मिस इंडिया वर्ल्ड २०२२ चा किताब जिंकणारी सिनी ही मूळची मुंबईची आहे. तिने अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये पदवी प्राप्त केली आहे आणि भरतनाट्यममध्ये प्रशिक्षण घेतले आहे. सिनीने अगदी बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. आजवर दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत तिने एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता ती धर्मा प्रोडक्शनसारख्या मोठ्या बॅनरमधून पदार्पण करण्यास सज्ज आहे.
Web Summary : Dostana 2 faces casting changes. After Kartik Aaryan's exit, Sini Shetty may replace Janhvi Kapoor alongside Lakshya and Vikrant Massey. Official confirmation awaited.
Web Summary : दोस्ताना 2 में कास्टिंग बदलाव। कार्तिक आर्यन के बाद, सिनी शेट्टी, जान्हवी कपूर की जगह लक्ष्य और विक्रांत मैसी के साथ दिख सकती हैं। आधिकारिक पुष्टि का इंतजार है।