Join us

'बेबी जॉन' फेम अभिनेत्री किर्ती सुरेशला मुंबईत येण्याची वाटते भीती; म्हणते- "मला टेन्शनच येतं कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:55 IST

अभिनेत्री किर्ती सुरेशला 'या' कारणामुळे मुंबईत येण्याची वाटते भीती ;म्हणते- "मला टेन्शनच येतं कारण..."

Keerthy Suresh : दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) सध्या 'बेबी जॉन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटामध्ये कीर्ति सुरेशसह वरुण धवन (Varun Dhawan), अभिनेते जॅकी श्रॉफ, वामिका गब्बी, सान्या मल्होत्रा आणि राजपाल यादव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. दरम्यान, 'बेबी जॉन' मधील नैन मटक्का या गाण्यामुळे तिची सर्वत्र चर्चा झाली. अलिकडेच कीर्तीने दिलेल्या एका मुलाखतीत तिने बऱ्याच गोष्टींचा खुलसा केला. 

नुकतीच कीर्ती सुरेशने  'Galata Plus' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने पापाराझींवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, कामानिमित्त मुंबईत आल्यानंतर अभिनेत्रीचा पापाराझींसोबत सामना झाला. तो अनुभव आपल्यासाठी खूप विचित्र असल्याचा तिने सांगितलं. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "मी पापाराझींना पाहून कॉन्शियस होते. एक अभिनेत्री असल्याने या सगळ्या गोष्टीची सवय असते. पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही सलॉन, शॉपमध्ये कुठेही याल. साउथमध्ये असं काही होत नाही." पुढे अभिनेत्री म्हणाली, "मी एक अशी मुलगी होते ज्या मुलीने कधीच स्वत: च्या त्वचेची काळजी घेतली नाही. जर तुम्ही मला ४ वर्षांपूर्वी पाहिलं असतं तर त्यावेळी मी कधीच स्किनकेअर प्रोडक्ट्स वापरले नाहीत. शिवाय मला बॉडी लोशन यांसारख्या गोष्टींबद्दल काहीच माहितचं नव्हतं. मग जेव्हा मी वजन (वेट लॉस) कमी केलं तेव्हा या सगळ्या गोष्टी समजू लागल्या. तेव्हा मग कळलं की केस आणि त्वचेची काळजी घेणं किती गरजेचं आहे. त्यानंतर मी स्वत: च्या लूककडे लक्ष देऊ लागले."

अभिनेत्रीला पापाराझींची वाटते भीती

"मुंबईत यायचं म्हटलं तर टेन्शनच येतं कारण समजतच नाही की कोणते कपडे घालावेत? या गोष्टींमुळे दडपण येतं. तुम्हाला विश्वास बसणार नाही की एकदा मी मुंबईकडे यायला निघाले असताना पापराझींमुळे माझी ट्रिप कॅन्सल देखील केली आहे. कारण मला पापाराझींची भीती वाटते. मी इतकी कनफ्यूज असते की कोणता ड्रेस परिधान करावा? मला हायहिल्समध्ये चालता येत नाही. यामुळे टेन्शन येतं. पण, मी आता या गोष्टींचा जास्त विचार करत नाही." असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

टॅग्स :बॉलिवूडवरूण धवनसेलिब्रिटी