ठळक मुद्देसध्या सूरज त्याच्या अफेअरमुळे चर्चेत आला आहेलॉरिसा थिका या तेलगू सिनेमात दिसली होती
सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सूरज त्याच्या प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असतो. लवकरच तो कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}} सध्या सूरज त्याच्या अफेअरमुळे चर्चेत आला आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार सूरज ब्राझीलीयन मॉडल लॉरिसा बॉनेसीला डेट करतोय. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची भेट एका जीममध्ये झाली. त्यानंतर मैत्रीत रुपांतर प्रेमात झाले. लॉरिसा थिका या तेलगू सिनेमात दिसली होती. लवकरच ती दिग्दर्शक कुणाल कोहलीच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सूरजचा 'सॅटेलाइट शंकर'मध्ये दिसणार आहे. 'सॅटेलाइट शंकर'मध्ये सूरज जवानाची भूमिका साकारीत असून सहा महिन्यांपूर्वी त्याने या चित्रपटाचे हिमाचल प्रदेशमधील चिटकुल येथील आर्मी कॅम्पमध्ये चित्रीकरण केले.
सूरजने शूटिंगदरम्यान हिमाचल प्रदेशमधील चिटकुल, आग्रा, पंजाब, तमीळनाडू आणि महाराष्ट्रातील जवानांच्या कॅम्पला भेट दिली आहे. त्याने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कामाबद्दल व मेहनतीबद्दल जाणून घेतले. इरफान कमल दिग्दर्शित 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात सूरजसोबत मेघा आकाश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.