Join us

'हम साथ साथ है' सिनेमात माधुरी दीक्षितला का घेतलं नाही? सूरज बडजात्यांनी सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:45 IST

माधुरीला करायचं होतं 'हम साथ साथ है' मध्ये काम, सूरज बडजात्यांनीच दिला नकार; कारण...

फिल्ममेकर सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांचं कोलॅबोरेशन नेहमीच सुपरहिट ठरलं आहे. 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' हे सिनेमे त्याचं उत्तम उदाहरण. या सिनेमांमधून सलमान खानला 'प्रेम' ही ओळखही मिळाली होती. 'हम आपके है कौन' मध्ये सलमान-माधुरी दीक्षितच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. नुकतंच सूरज बडजात्या यांनी एका मुलाखतीत नवीन खुलासा केला आहे. माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) 'हम साथ साथ है' मध्येही काम करण्याची इच्छा होती. मात्र तिला रिजेक्ट करण्यात आलं होतं असं ते म्हणाले आहेत. 

सूरज बडजात्या यांनी नुकतीच 'रेडिओ नशा'ला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, "माधुरीला हम साथ साथ है मध्येही काम करायचं होतं. यासाठी ती सलमानच्या भाभीची भूमिका साकारायलाही तयार होती. पण मी तिला म्हणालो की माधुरी, मी पुरुष प्रधान फिल्म बनवत आहे. यात जर मी तुला सलमानच्या अपोझिट कास्ट केलं तर तो तुझ्यासाठी खूप छोटा रोल असेल. ती खूपच प्रेमळ आहे. ती म्हणाली की, मला याने काही फरक पडत नाही. एकत्र काम करु यातच आनंद आहे. पण माधुरीला या रोलसाठी घेण्यात मीच कंफर्टेंबल नव्हतो. तसंच सलमानही माधुरीला त्याच्या वहिनीच्या रोलमध्ये नको म्हणला असता. कारण त्या दोघांनी 'हम आपके है कौन' मध्ये रोमान्स केला होता. म्हणूनच आम्ही माधुरी नाही तर तब्बूला या भूमिकेसाठी घेतलं."

'हम साथ साथ है' १९९९ मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये आलोक नाथ, रीमा लागू, मोहनशी बहल, सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, करिष्मा कपूर यांची मुख्य भूमिका होती. सलमान-सोनालीची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली होती.

टॅग्स :माधुरी दिक्षितसलमान खानबॉलिवूड