Join us

'हेच माझे धन आहे...' सोनम कपूरने शेअर केला मुलाचा आणि पतीचा गोड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 19:11 IST

सोनम कपूरने चाहत्यांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडची 'मसकली गर्ल' सोनम कपूर (Sonam Kapoor) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. बिझनेस आनंद आहुजाची ती पत्नी असून त्यांना वायू हा मुलगाही आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सोनम कपूर तिच्या मुलाचे खूप सुंदर फोटो शेअर करताना दिसते. आज धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनमने पती आनंद आणि मुलगा वायू यांचा एक फोटो शेअर केला आहे. 

सोनम कपूरने चाहत्यांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये आनंद आहुजा आणि वायु दिसत आहेत.  अभिनेत्रीने लिहिले, 'हेच माझं धन आहे... सर्वांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.. देवी लक्ष्मी, भगवान कुबेर तुम्हाला संपत्ती, समृद्धी आणि निरोगी राहू दे'. सोनमच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

नुकतेच नवरात्रीच्या मुहुर्तावर सोनमने हे नवीन घर घेतलंय. सोनम आणि तिचा मुलगा वायू यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सोनम खूपच आलिशान आयुष्य जगते हे आपण अनेकदा पाहिलंच आहे. लंडन, दिल्लीत तिचं आलिशान घर आहे.  

सोनम कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास, तिने  अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.  तिने 2007 मध्ये रणबीर कपूरसोबत संजय लीला भन्साळीच्या सावरिया या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.  'रांझना', 'नीरजा', 'प्रेम रतन धन पायो' आणि इतर चित्रपटातून आपला ठसा उमटवला आहे. आता ती 'बॅटल फॉर बिटोरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाचे काम सुरू होणार आहे. हा चित्रपट अनुजा चौहानच्या कादंबरीवर आधारित आहे.

टॅग्स :सोनम कपूरबॉलिवूड