Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुलकर्णीने दीपिका पादुकोणची या शब्दांत केली स्तुती, म्हणाली - ...नव्याने झाली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 19:32 IST

'छपाक' चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पादुकोण आणि सोनाली कुलकर्णीने दिलखुलास गप्पा मारल्या.

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिचा आगामी चित्रपट 'छपाक'मुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. या चित्रपटामध्ये दीपिकाने ‘मालती’ या ऍसिड अटॅक सर्व्हायव्हरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या निडर भूमिकेने तिने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

अनेक सेलिब्रिटींना देखील या चित्रपटाच्या विषयाने आणि दीपिकाच्या लूकने भुरळ घातली आहे. अनेकांनी दीपिकाच्या 'छपाक'मधील भूमिकेचे कौतुक केले असून यामध्ये आपली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील आघाडीवर आहे.  या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पादुकोण आणि सोनाली कुलकर्णीने दिलखुलास गप्पा मारल्या. 

सोनालीने दीपिकाला ऍसिड हल्ल्यासारख्या एका संवेदनशील मुद्द्याला हात घातल्याबाबत अभिनंदन केले. या भेटीबाबत बोलताना सोनाली म्हणाली की, दीपिका स्वतः खूप सुंदर अभिनेत्री आहे आणि आपल्या आगामी 'छपाक' या चित्रपटामध्ये तिने ‘मालती’ या ऍसिड हल्ला झालेल्या दुर्दैवी मुलीची भूमिका साकारण्याचा घेतलेला निर्णय हा खूपच धाडसी आहे.

दीपिकाने चित्रपटात साकारलेली मालतीची भूमिका आणि मालतीला वैयक्तिक आयुष्यात आलेल्या विदारक अनुभवातून जाणं, हे खरोखरच किती भयानक असू शकतं, हे छपाक या चित्रपटाविषयी दीपिकासोबत बोलताना प्रत्येक क्षणी जाणवत राहतं, असं सोनाली म्हणाली.

या चित्रपटाविषयी बोलताना दीपिकाशी नव्याने ओळख झाली आणि तिचे व्यक्ती म्हणून सुंदर असण्याचे अनोखे पैलू समोर आल्याचे सोनाली म्हणाली.

टॅग्स :दीपिका पादुकोणसोनाली कुलकर्णीछपाक