Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:51 IST

मुलाखतीत राज ठाकरेंसोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारला असता अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी स्पष्ट उत्तर दिले.

मुंबई - बॉलिवूडमध्ये बऱ्याच ग्लॅमरस अभिनेत्री आहेत, त्यांच्या अफेअरबाबत विविध गॉसिप सुरूच असते. त्यातच ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यासोबतही असेच काही घडले. अलीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाला. या व्हिडिओत सोनाली आणि राज यांच्या जुन्या नात्याबाबत दावा करण्यात आला. परंतु आता या व्हायरल क्लिपवर स्वत: अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्पष्टपणे खुलासा केला आहे.

राज ठाकरेंसोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारला असता अभिनेत्री सोनाली बेंद्रे म्हणाली की, काय खरेच,  मला तर शंका आहे. व्हिडिओबाबत बोलायचे झाले तर मी माझ्या बहिणीसोबत बोलत होती, जी तिथेच उभी होती. मला माहिती नाही. जेव्हा लोक अशाप्रकारे बोलत असतात तेव्हा ते चांगले वाटत नाही. कारण त्यात कुटुंब सहभागी असते, अनेक लोक सहभागी असतात. आमचे ठाकरे कुटुंबाशी गेली अनेक दशके नाते आहे. माझे दाजी एक क्रिकेटर होते ते राज यांच्या चुलत भावासोबत एकत्र क्रिकेट खेळायचे. ते नेहमी एकत्र होते असं तिने सांगितले.

दुसरे माझ्या बहिणीची सासू जी HOD होती, ज्या आम्हाला रुईया कॉलेजमध्ये इंग्लिश लिट्रेचर शिकवत होत्या, तिथून मीही आहे आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो. राज यांच्या पत्नी शर्मिला, त्यांची सासू आणि माझी मावशी सर्व चांगल्या मैत्रिणी होत्या. शर्मिला यांच्या आईने १० दिवस मला त्यांच्याकडे ठेवले होते कारण ती माझ्या आईची छोटी बहीण होती हे तुम्हाला माहित्येय..ती माझी मावशी आहे असं सांगत सोनाली बेंद्रे हिने राजकारणात येण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही. मला ते जमणार नाही असंही सोनाली म्हणाली. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने या व्हिडिओवर खुलासा केला. 

३० वर्षांनंतर राज ठाकरे-सोनाली बेंद्रे भेटले होते, मग...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्यातील सोनाली बेंद्रे यांच्या उपस्थितीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. १९९६ साली मुंबईत पहिल्यांदा मायकल जॅक्शनच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्र दिसून आले. त्यानंतर ३० वर्षांनी हे दोघे भेटले होते. त्यानंतर या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियात बराच व्हायरल झाला. त्यावर सोनालीने भाष्य केले. 

टॅग्स :सोनाली बेंद्रेराज ठाकरेमनसे