Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हॅप्पी फिर भाग जायेगी'मधील गाणं 'स्वॅग सहा नहीं जाये...' झालं रिलीज, सोनाक्षी करतेय भांगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 12:50 IST

'स्वॅग सहा नहीं जाये...' या गाण्याला रसिकांची चांगलीच पसंती मिळते आहे. या गाण्यात सोनाक्षी भांगडा करताना दिसते आहे.

ठळक मुद्देसोनाक्षी सिन्हा दिसणार भांगडा करताना'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपट २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री डायना पेंटी व सोनाक्षी सिन्हा यांचा आगामी चित्रपट 'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपटातील पहिले गाणे 'स्वॅग सहा नहीं जाये...' रिलीज झाले आहे. या गाण्यात सोनाक्षी भांगडा करताना दिसते आहे. या गाण्याला नेहा भसीनने स्वरसाज दिला आहे. या गाण्याला रसिकांची चांगलीच पसंती मिळते आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी गाणे प्रदर्शित करण्यापूर्वी या गाण्याचे पोस्टर प्रदर्शित करून माहिती दिली. या पोस्टरमध्ये सोनाक्षी डान्स स्टेप करताना दिसते आहे.

दोन वर्षांपूर्वी आलेला 'हॅपी भाग जायेगी' या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनपेक्षित यश मिळवले होते. चित्रपटाचे हेच यश पाहून मेकर्सनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची घोषणा केली होती. 'हॅपी फिर भाग जायेगी' नामक हा सीक्वल प्रदर्शनासाठी तयार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात डायना पेेंटी लीड रोलमध्ये होती. सीक्वलमध्ये सोनाक्षी सिन्हा हॅपी बनलेली दिसते.  

'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपटात जस्सीने चीनमध्ये राहणाऱ्या पंजाबी तरूणाची भूमिका साकारली आहे. या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी जस्सीने पंधरा दिवस मंदारीन भाषेचे प्रशिक्षण घेतले आहे. जस्सी म्हणाला की, 'मंदारीन शिकणे खूप आव्हानात्मक होते. त्यामुळे ही भाषा बोलणे दूरच राहिले. सुरूवातीला ही भाषा समजून घ्यायला खूप कठीण गेले. मी शब्दांचा उच्चार योग्य होण्यासाठी खूप मेहनत घेतली. यासाठी इंग्रजी सबटायटल्ससोबत मंदारीन भाषेतील काही व्हिडिओ पाहिले. मंदारीन शिकल्यानंतर चित्रीकरणापूर्वी मी उच्चारांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे काम सोपे झाले. 'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपटात एक हॅप्पी नाही तर दोन हॅप्पी धावताना दिसणार आहेत. या चित्रपटात सोनाक्षी व डायना यांच्यासह अभय देओल, अली फैजल व शक्ती खुराना दिसणार आहे. हा चित्रपट २४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाडायना पेन्टी