Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोहेल खानसोबत दिसलेली की 'मिस्ट्री गर्ल' कोण? अभिनेत्यानेच केलं स्पष्ट; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 18:59 IST

नुकतंच सोहेल एका महिलेसोबत डिनर डेटवर गेलेला दिसला.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा छोटा भाऊ सोहेल खान (Sohail khan) अचानक चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वीच सोहेलचा पत्नी सीमा सजदेहसोबत घटस्फोट झाला. आता नुकतंच सोहेल एका महिलेसोबत डिनर डेटवर गेलेला दिसला. पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद केलं. ती महिला नेमकी कोण यावरुन चर्चा सुरु झाली. ती सोहेलची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा पसरली. यावर आता सोहेलने उत्तर दिलं आहे.

ती मिस्ट्री गर्ल कोण? या चर्चांवर 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या प्रतिक्रियेत सोहेल खान म्हणाला, "या चर्चा खोट्या आहेत. ती माझी जुनी मैत्रीण आहे. तुम्ही मला आधी विचारुन कन्फर्म केलंत म्हणून मी हे सांगतोय." असं म्हणत सोहेलने सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला. 

सोहेल खान काल एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाला. त्याच्यासोबत एक महिला होती. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. अरबाज खाननंतर सोहेललाही दुसरं प्रेम मिळालं का अशी चर्चा झाली. मात्र आता सोहेलने यावर थेट स्पष्टीकरण दिलं आहे. ५३ वर्षीय सोहेल खानचा सीमा सजदेहसोबत काही वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला. त्याआधीपासूनच ते वेगळे राहत होते. दोघांना एक मुलगाही आहे ज्याचं नाव निर्वान आहे. 

 

टॅग्स :सोहेल खानबॉलिवूडसोशल मीडिया