Join us
Daily Top 2Weekly Top 5

 या अभिनेत्रीने केला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे तिचा भावी पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 08:00 IST

होय, या अभिनेत्रीने सोशल मीडियावर साखरपुड्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली.

ठळक मुद्देफ्रिडाने ‘स्लमडॉग मिलिनेयर’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.

‘लव सोनिया’ व ‘स्लमडॉग मिलिनेयर’ यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटो हिने नुकताच साखरपुडा केला. होय, खुद्द फ्रिडाने सोशल मीडियावर साखरपुड्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली. फ्रिडा दीर्घकाळापासून कोरी ट्रॅन याला डेट करतेय. याच कोरीची फ्रिडाने लाईफ पार्टनर म्हणून निवड केली आहे.

फ्रिडाने कोरीसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. शिवाय साखरपुड्याची गोड बातमीही दिली. ‘आता सगळे काही अर्थपूर्ण वाटतेय. हे आयुष्य, हे जग, ते अश्रू आणि प्रयत्न सगळ्यांचा अर्थ गवसू लागला आहे. प्रेमाबद्दल जे काही सांगितले गेलेय, त्याचा अर्थही कळू लागला आहे. तू माझ्या आयुष्यात आलेली सर्वोत्तम व्यक्ति आहेस. तू निरंतर इथेच राहतील, यासाठी मी प्रयत्न करेल. माझ्या भावी पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,’असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

फ्रिडाचा होणारा पती कोरी ट्रॅन हा पेशाने फोटोग्राफर आहे. याच वर्षी एका सामन्यादरम्यान ते एकमेकांना किस करताना दिसले होते.याआधी फ्रिडा देव पटेल आणि रॉनी बकार्डीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.  फ्रिडाचे ‘स्लमडॉग मिलिनेयर’चा अभिनेता अभिनेता देव पटेल याच्यासोबत अफेयर होते. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते विभक्त झाले. यानंतर फ्रिडाच्या आयुष्यात पोलो प्लेअर रॉनी बकार्डी याची एन्ट्री झाली. पण हे नातेही फार काळ टिकले नाही.

फ्रिडाने ‘स्लमडॉग मिलिनेयर’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटाने 8 ऑस्कर पुरस्कार जिंकले होते. यानंतर फ्रिडाने तृष्णा, ब्लॅक गोल्ड, नाईट ऑफ कप्स, डेजर्ट डान्सर, लव सोनिया अशा अनेक चित्रपटांत काम केले.

टॅग्स :फ्रीडा पिंटो