Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' दिवशी येतोय 'सिंघम अगेन'चा ट्रेलर! 'भूल भूलैय्या ३' सोबत होणार का टक्कर? मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 15:51 IST

रोहित शेट्टीचा बहुचर्चित 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरची डेट समोर आलीय. याशिवाय सिनेमाची 'भूल भूलैय्या ३' सोबत टक्कर होणार का? याविषयीची मोठी बातमी समोर आलीय

२०२४ चा बहुचर्चित आणि बिग बजेट सिनेमा म्हणजे 'सिंघम अगेन'. अजय देवगणच्या गाजलेल्या  'सिंघम' सिनेमाचा हा तिसरा भाग. रोहित शेट्टी पुन्हा एकदा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 'सिंघम अगेन' विषयी मोठ्या बातम्या समोर येत आहेत. सिनेमाच्या शूटींगचे सीन्सही व्हायरल झाले होते. आता 'सिंघम अगेन' चा ट्रेलर कधी रिलीज होणार, याशिवाय 'सिंघम अगेन'ची 'भूल भूलैय्या ३' सोबत टक्कर होणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.

या दिवशी 'सिंघम अगेन'चा ट्रेलर रिलीज?

बॉलिवूडचे लोकप्रिय समीक्षक, विश्लेषक तरण आदर्श यांनी 'सिंघम अगेन' विषयी दोन महत्वाची अपडेट दिली आहे. यापैकी एक म्हणजे  'सिंघम अगेन'चा ट्रेलर पुढील महिन्यात भेटीला येणार आहे. २ किंवा ३ ऑक्टोबरला  'सिंघम अगेन'चा ट्रेलर भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता चाळवण्यात आली आहे. तर दुसरी अपडेट म्हणजे  'सिंघम अगेन' दिवाळीलाच रिलीज होणार आहे. असं सांगण्यात आलं होतं की, 'भूल भूलैय्या ३' साठी रोहित शेट्टी सिंघम अगेनची रिलीज डेट पुढे ढकलेल पण तरण आदर्श यांनी दिलेल्या अपडेटनुसार, 'सिंघम अगेन' दिवाळीतच रिलीज होणार आहे. त्यामुळे 'भूल भूलैय्या ३' आणि  'सिंघम अगेन'मध्ये महामुकाबला बघायला मिळेल.

 

 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौज

रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन'च्या माध्यमातून एक संपूर्ण पोलिस विश्व निर्माण केले आहे. 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर हे देखील या पोलीस विश्वाचा एक भाग असतील. रोहितने याआधी अजय देवगणसोबत 'सिंघम' आणि 'सिंघम २' बनवला होता. तर रणवीर सिंगसोबत 'सिम्बा' आणि अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी' बनवला होता. सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता दिवाळीत एकत्र रिलीज झाल्याने 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' या दोन्ही सिनेमांना कसा प्रतिसाद मिळतोय, याची उत्सुकता आहे.

टॅग्स :अजय देवगणरोहित शेट्टीअक्षय कुमाररणवीर सिंग