Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बॉलिवूड इंडस्ट्रीतले लोक उद्धट...", लकी अली स्पष्टच बोलले, आजकालच्या सिनेमांवरही केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:53 IST

'आजकाल सिनेमांमध्ये फक्त...', लकी अली काय म्हणाले?

'ओ सनम' फेम गायक लकी अली यांची गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर असतात. ९० च्या काळात त्यांच्या गाण्यांची जादू पसरली होती. त्यांचा 'सुनो' हा पहिला अल्बम रिलीज झाला होता. तर 'कहो ना प्यार है' सिनेमातून त्यांनी पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं होतं. इंडीपॉप हा संगीतप्रकार त्यांच्यामुळे खूप गाजला. काही वर्षांनी लकी अलीबॉलिवूडपासून दूर झाले. त्यांनी नुकतंच इंडस्ट्रीवर भाष्य केलं.

एका मुलाखतीत लकी अली म्हणाले, "बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप असभ्यता पाहायला मिळते. इथले लोक खूप उद्धट आहेत. आजकाल जे सिनेमे बनत आहेत त्यातून ना कोणती प्रेरणा मिळते ना ही कोणती शिकवण मिळते. सध्या सिनेमांमध्ये केवळ हिंसा, लालच आणि इम्पेशन्सलाच वाढीवरित्या दाखवण्यात येतं. हे समाजाला चुकीच्या दिशेला नेतं."

याच कारणामुळे लकी अली यांनी बॉलिवूडपासून लांब राहणंच पसंत केलं. त्यांची अगदी मोजकीच गाणी सिनेमांमध्ये असतात. रणबरी कपूर, दीपिका पादुकोणच्या 'तमाशा' सिनेमातलं त्यांचं 'सफरनामा' हे गाणं चाहत्यांना खूप आवडलं. जवळपास दशकभरानंतर त्यांनी गेल्यावर्षी आलेल्या 'दो और दो प्यार' सिनेमात 'तू हे कहां' हे गाणं गायलं. सोशल मीडियावर लकी अली यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. डोंगर भागांमध्ये क्रूजर बाईक चालवताना ते दिसतात. त्यांना प्रवास करायला खूप आवडतो हे त्यांच्या सोशल मीडियावरून दिसून येतं. 

टॅग्स :लकी अलीसंगीतबॉलिवूड