९० च्या दशकातील लोकप्रिय गायक लकी अली (Lucky Ali) आज ६७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. 'ओ सनम', 'सफरनामा', 'कितनी हसीन जिंदगी है ये' अशी त्यांची अनेक गाणी चाहत्यांच्या ओठांवर आहेत. लकी अली यांचं वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत राहिलं. त्यांनी तीन लग्न केली. तर आता चौथ्या लग्नाचीही त्यांनी इच्छा दाखवली आहे.
लकी अली यांनी तीन वेळा लग्न केलं. त्यांना पाच मुलं आहेत. त्यांचं पहिलं लग्न मेगन जेन मलक्लियरीसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलं झाली. काही वर्षांनी मेगन आणि लकी अली यांचा घटस्फोट झाला. नंतर लकी अली यांनी पारसी महिला अनाहिताशी दुसरं लग्न केलं. तिने लग्नानंतर धर्मांतरही केलं. त्यांनाही दोन मुलं झाली. मात्र हेही लग्न टिकलं नाही. मग लकी अली यांनी ब्रिटिश मॉडेल केट एलिजाबेथशी तिसरं लग्न केलं. केट त्यांच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान होती. हे लग्नही २०१७ मध्ये तुटलं. तर आथा लकी अली यांनी या वयातही चौथ्या लग्नाची इच्छा बोलून दाखवली. पुन्हा लग्न करणं हे त्यांचं स्वप्न असल्याचं ते म्हणाले.
प्रसिद्ध कॉमेडियन महमूद अली हे लकी अली यांचे वडील होते. १९९६ साली लकी अली यांचा 'सुनो' हा पहिला अल्बम रिलीज झाला. यातलं 'ओ सनम' हे गाणं आजही लोक आवडीने ऐकतात. त्यानंतर लकी अली यांनी बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन केलं. 'कहो ना प्या है'मधली त्यांची सगळी गाणी गाजली. आजही त्यांच्या आवाजातली जादू कमी झालेली नाही. लकी अली अनेकदा गोव्यात असतात आणि बाईकवर डोंगरदऱ्यात फिरताना दिसतात.