Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 19 व्या वर्षी ड्रग्जच्या आहारी गेला होता जस्टीन बीबर, केलेत अनेक धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 15:04 IST

पॉप सिंगर जस्टीन बीबर 13 व्या वर्षी ग्लोबल स्टार बनला. पण या प्रवासात त्याने अनेक चढउतार बघितले. आता जस्टीनने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

ठळक मुद्देअलीकडे जस्टीनने तो तणावातून जात असल्याचा खुलासा केला होता. गतवर्षी त्याने अमेरिकन मॉडेल हॅली बाल्डविनसोबत लग्न केले होते.

आपल्या गाण्यांनी जगभरातील तरूणाईला ‘याड’ लावणारा पॉप सिंगर जस्टीन बीबरने 2008 साली गायनाला सुरुवात केली आणि त्याच्या गाण्यांनी तरूणाईला भुरळ घातली. 13 व्या वर्षी तो ग्लोबल स्टार बनला. पण या प्रवासात त्याने अनेक  चढउतार बघितले. आता जस्टीनने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.होय, इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून जस्टीने आपल्या आयुष्यातील काही शॉकिंग खुलासे केलेत.

‘जेव्हा तुम्ही तुमचा भूतकाळ, जबाबदा-या भावना, कुटुंब, नाती, ऐश्वर्य अशा सगळ्यांनी भारावता, तेव्हा सकाळी बिछाण्यावरून उठणे कठीण होते. एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करताना, मनात भीतीचे काहूर माजते. मी भूतकाळात अनेक आत्मघाती विचारांना बळी पडलो. पण मी नशीबवान आहे की, लोकांनी मला सतत प्रोत्साहित केले. वयाच्या 19 व्या वर्षी मी ड्रग्जच्या आहारी गेलो आणि नात्यांचा दुरूपयोग केला. माझ्यावर प्रेम करणा-यांना मी दूर लोटले. मी कायम बेजबाबदारपणे वागलो. मला वाटेल तसे मी वागलो. पण याकाळात केलेल्या अनेक चुका सुधारण्यात अनेक वर्षे गेलीत. तुटलेली नाती जोडा...,’ असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

अलीकडे जस्टीनने तो तणावातून जात असल्याचा खुलासा केला होता. गतवर्षी त्याने अमेरिकन मॉडेल हॅली बाल्डविनसोबत लग्न केले होते.

जस्टीन व हॅली २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. मध्ये दोघांच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण नंतर पुन्हा दोघे जवळ आलेत आणि आता दोघांचा साखरपुडाही झाला. पुढे दोघांनी लग्न केले.  हॅलीआधी जस्टीन अभिनेत्री सेलेना गोमेज हिला डेट करत होता. पण 2014 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते.

टॅग्स :जस्टिन बीबरहॉलिवूड