Join us

हात जोडले अन्...; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मराठी अभिनेत्याला पाहताच अरिजीत सिंहने केलेल्या 'त्या' कृतीचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:30 IST

आपल्या सुमधूर आवाजाने आणि अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक म्हणजे अरिजीत सिंह.

Sharad Kelakar Post For Arijit Singh : आपल्या सुमधूर आवाजाने आणि अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक म्हणजे अरिजीत सिंह (Arijit Singh). या गायकाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींच्या मनावर त्याने आपल्या आवाजाने मोहिनी घातली आहे. बऱ्याचदा ते त्याच्या कॉन्सर्टला देखील हजेरी लावतात. याचदरम्यान, मराठमोळा अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelakar) अरिजीत सिंगच्या कॉन्सर्टचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्यामने पत्नीसह हजेरी लावली. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे भर कॉन्सर्टमध्ये शरद केळकरला पाहताच गायकाने गाणे थांबवून त्याचे कौतुक केले. 

अभिनेता शरद केळकर हा त्याच्या चित्रपटांसह सोशल मीडियावर सुद्धा अनेकदा चर्चेत येतो. त्याच्या कामाच्या माध्यमातून तो लाखो चाहत्यांसोबत जोडला गेला आहे. नुकताच सोशल मीडियावर शरद केळकरचा अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टंमधील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क अरिजीत सिंहने गाणं थांबवून शरद केळकरला म्हणाला,"खूप खूप प्रेम भाऊ, इथे आल्याबद्दल मनापासून धन्यवाद”. यानंतर अरिजीतने त्याचे आभार देखील मानले. दरम्यान, शरद केळकरने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत म्हटलंय की अरिजीत सिंह, "तू माझा दिवस सार्थकी लावलास. खरंतर तू माझं वर्ष सार्थकी लावलंस. माझ्या कामाची प्रशंसा केल्याबद्दल धन्यवाद."

या व्हिडीओमध्ये शरद त्याच्या पत्नीसह अरिजीतचे गाणे ऐकत सुरांच्या मैफिलीत दंग झाला आहे. त्यानंतर अभिनेत्याने लिहिलंय, तुझ्यासारख्या दिग्गज कलाकाराचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहणं हा एक कमाल अनुभव होता. तू खरोखरच अद्भुत आहेस". असं कॅप्शन अभिनेत्याने या पोस्टला दिलं आहे. 

टॅग्स :शरद केळकरअरिजीत सिंहबॉलिवूडसेलिब्रिटी