Join us

Boycott Maldives; PM मोदींचा लक्षद्वीप दौऱ्यानंतर गायक अंकित तिवारीने केली मालदीव ट्रीप कॅन्सल; पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:04 IST

अंकित तिवारीने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत चाहत्यांना मालदीव ट्रीप कॅन्सल केल्याची  माहिती दिली आहे.

Boycott Maldives : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात केलेल्या आक्षपार्ह टिप्पणीमुळे दोन्ही देशांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर सोशल मीडियावरही बायकॉट मालदीव ट्रेंड सुरु झाला.

त्याचाच परिणाम म्हणजे भारतीय पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात मालदीव ट्रीपची काढलेली तिकिटे रद्द केली. बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमारसह सलमान खानने देखील या वादात उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यात आता बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाने या संदर्भात केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.

प्लॅन बदलला.  मी पत्नी आणि मुलीसह मालदीवला जाणार होतो. पण आता आम्ही त्यापेक्षा चांगलं आणि कधीही न पाहिलेलं आपल्याच देशातलं लक्षद्वीप बेट अनुभवणार आहोत.असं सूचक ट्वीट अंकितने केलं आहे. दरम्यान, त्याच्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

बॉलिवूडचा गाजलेला चित्रपट आशिकी २ मधून अवघ्या सिनेरसिकांवर आपल्या आवाजाची मोहिनी घालणारा गायक म्हणजे अंकित तिवारी. नुकतीच अंकित तिवारीने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत चाहत्यांना मालदीव ट्रीप कॅन्सल केल्याची  माहिती दिली आहे. अंकित तिवारीने पंतप्रधानांच्या समर्थनार्थ त्याने  मालदीव ट्रीप कॅन्सल केल्याचं पाहायला मिळतंय.

येथे पाहा -

टॅग्स :अंकित तिवारीनरेंद्र मोदीमालदीव