कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ एकीकडे बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. दुसरीकडे या चित्रपटाच्या निमित्ताने कंगना टीकेची धनी ठरतेय. खरे तर सुरुवातीपासूनचं कंगनाच्या या चित्रपटाने वाद ओढवून घेतलेत. आधी कंगनाला वैतागून सोनू सूूदने या चित्रपटातून अंग काढून घेतले. मग दिग्दर्शनाच्या क्रेडिटवरून कंगना वादात सापडली. रिलीजच्या अगदी तोंडावर करणी सेनेने या चित्रपटाला विरोध केला. रिलीजनंतर या सर्व वादांवर पडदा पडेल, असे वाटले होते. पण क्रेडिटचा वाद आणखीच तापला. आता तर या वादात ‘सिमरन’ या चित्रपटाचे लेखक अपूर्व असरानी यांनीही उडी घेतली आहे.
कंगना राणौत- क्रिश वादात अपूर्व असरानीची उडी! ‘मणिकर्णिका’ला म्हटले फ्लॉप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 14:52 IST
कंगना राणौत- क्रिश वादात ‘सिमरन’ या चित्रपटाचे लेखक अपूर्व असरानी यांनीही उडी घेतली आहे.
कंगना राणौत- क्रिश वादात अपूर्व असरानीची उडी! ‘मणिकर्णिका’ला म्हटले फ्लॉप!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}