Join us

बायकोला उचलून पायऱ्या चढला पठ्ठया! सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:33 IST

'फसक्लास दाभाडे' चित्रपटात सिद्धार्थ आणि मिताली एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

 'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade) या मराठी चित्रपटाची (Marathi Movie) सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाचे महाराष्ट्रात जोरदार प्रमोशन सुरु आहे. नुकतंच या सिनेमातील 'तोड साखळी' गाणं प्रदर्शित झालं. त्यानिमित्ताने चित्रपटातील कलाकारांनी  निमगाव दावडीमधील क्षेत्र खंडोबा देवस्थान इथं दर्शन घेत आशीर्वाद घेतले. 

निमगाव दावडीला शुट केलेलं  'तोड साखळी' हे गाणं निमगाव दावडीच्या खंडोबा चरणी अर्पण करण्यात आलं.  यावेळी प्रथेनुसार सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) याने पत्नी मिताली मयेकरला (Mitali Mayekar) उचलून घेत पायऱ्या चढत मंदिरात प्रवेश केला. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत सिद्धार्थ आणि मितालीनं जोडीनं खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळी मिताली हिरव्या रंगाच्या पैठणीत अगदी सुंदर दिसतेय. 

 

24 जानेवारी रोजी ‘फसक्लास दाभाडे' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ आणि मिताली पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. चाहत्यांचं लाडकं जोडपं एकत्र पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ आणि मितालीनं 2021 मध्ये लग्नगाठ बांधली होती. ही रोमँटिक जोडी ऑनस्क्रिन एकत्र केव्हा झळकणार याची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरमराठी अभिनेतामराठी चित्रपट