Join us

OMG! अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चनच्या नव्या-कोऱ्या फॅशन ब्रँडवर चोरीचा ठपका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 21:22 IST

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिने कालपरवाच फॅशन डिझाईनर मोनिषा जयसिंग हिच्यासोबत मिळून आपला MxS हा फॅशन ब्रँड लॉन्च केला.

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिने कालपरवाच फॅशन डिझाईनर मोनिषा जयसिंग हिच्यासोबत मिळून आपला MxS हा फॅशन ब्रँड लॉन्च केला. मुंबईत श्वेताच्या फॅशन स्टोरचे दणक्यात उद्घाटन झाले. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या उद्घाटनाला हजेरी लावली. अख्खी बच्चन फॅमिलीही यावेळी दिसली. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी श्वेताच्या स्टोर लॉन्चला   हजेरी लावली.पण हा फॅशन ब्रँड लॉन्च होऊन दोन दिवस होत नाही तोच, त्यावर चोरीचे आरोप लावले गेलेत. ‘फॅशन कॉपीकॅट्स’ची पोलखोल करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नामक dietsabya इन्स्टाग्राम हँडलने ने एका नामांकित ब्रँडची नक्कल केल्याचा ठपका ठेवला आहे.

dietsabyaने एक फोटो शेअर केला आहे. यात श्वेता बच्चनने आपल्याच MxSब्रँडचा टी-शर्ट कॅरी केला आहे. श्वेताचा हा फोटो शेअर करत dietsabyaया इन्स्टा हँडलने वर हा ठपका ठेवला आहे़ ‘तुम्ही एअरप्लेन मोडच्या स्वेट शर्टला गुगलवर सर्च केल्यास सर्वप्रथम नामांकित ब्रँड ‘द लॉऊंड्री’चे फोटो तुम्हाला दिसतील. रिटेल ब्रँड सुद्धा तरूणींसाठी आरामदायी स्वेट शर्टसाठी ओळखला जातो आणि आता श्वेताच्या ब्रँडने अगदी हुबेहुब सारखे स्लोगन लिहिलेला स्वेटशर्ट बाजारात आणला आहे,’ असे कॅप्शन ने लिहिले आहे.

 

टॅग्स :अमिताभ बच्चन