Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महानायका'ला घरात आहे 'या' व्यक्तीचा धाक, लेकीनेचं केली बिग बींची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:43 IST

Amitabh bachchan: सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बिग बी, महानायक, शहेनशहा अशा कितीतरी नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan). गेल्या कित्येक दशकापासून बिग बी बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. त्यामुळे कलाविश्वात त्यांचा दरारा पाहायला मिळतो. परंतु, इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या बिग बींच्या घरात मात्र एकाच व्यक्तीचा हुकूम चालतो. विशेष म्हणजे बिग बींच्या घरातील घरातली ही खास गोष्ट त्यांच्या लेकीने श्वेता नंदा हिनेच सांगितली आहे.

सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या लेकीने घरात नेमकी कोणाची मक्तेदारी आहे हे सांगितलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बिग बींचा नातू अगस्त्य नंदा त्यांच्या इक्कीस या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी त्याच्यासोबत जयदीप अहलावत,श्वेता नंदा, सिमर भाटिया आणि नव्या नंदा सुद्धा सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यावेळी जयदीपने बिग बींना एक प्रश्न विचारला ज्यामुळे बिग बी काही काळ स्तब्ध झाले.काय होता जयदीपचा बिग बींना प्रश्न?

"घरामध्ये जया बच्चन (jaya bachchan)यांचा सगळ्यात जास्त ओरडा कोणाला मिळतो?" असा प्रश्न जयदीपने अमिताभ बच्चन यांना विचारला. या प्रश्नामुळे बिग बी काही वेळासाठी स्तब्ध झाले. त्यानंतर त्यांनी अगस्त्यकडे पाहिलं. आणि, अगस्त्य सुद्धा खळखळून हसायला लागला. 

श्वेताने सांगितलं घरातलं सिक्रेट

जयदीपच्या प्रश्नावर बिग बी आणि अगस्त्य हसत असतांनाच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या श्वेताने (shweta bachchan) हात वर केला. आणि, घरातलं सिक्रेट सांगितलं. "आमच्या घरात सगळ्यात जास्त आईचा ओरडा मला आणि पप्पांना (अमिताभ बच्चन) मिळतो", असं श्वेताने सांगितलं. इतकंच नाही तर तिच्या या वक्तव्यावर बिग बींनीही तिची फिरकी घेतली. "श्वेता घरी चल मग तुला सांगतो", असं मजेमध्ये बिग बी म्हणाले. आणि, सेटवर एकच हशा पिकला.

दरम्यान, अगस्त्यचा इक्कीस हा सिनेमा नुकताच १ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ७ कोटींचा गल्ला जमवला आहे. हा सिनेमा सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amitabh Bachchan fears Jaya; daughter Shweta reveals family secret.

Web Summary : Big B, despite his stardom, is disciplined at home. Shweta Nanda revealed Jaya Bachchan scolds her and Amitabh the most. This confession occurred on 'Kaun Banega Crorepati' during a promotional event for Agastya's new film.
टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडजया बच्चनसेलिब्रिटीकौन बनेगा करोडपती