Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरं की खोटं? अखेर श्रुती हसनने लग्नाविषयी केला खुलासा; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 14:04 IST

नुकतेच श्रुतीने बॉयफ्रेंड शांतनू हजारिकासोबत लग्न केल्याची माहिती बॉलिवूड सेलिब्रिटी ओरी (ओरहान अवत्रामणी) यानं दिली होती.

अभिनेत्री श्रुती हसन तिच्या लूक आणि स्टायलिश अंदाजामुळे अनेकदा चर्चेत असते. याशिवाय श्रुती ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिची फॅन फॉलोविंगदेखील प्रचंड आहे. नुकतेच श्रुतीने बॉयफ्रेंड शांतनू हजारिकासोबत लग्न केल्याची माहिती बॉलिवूड सेलिब्रिटी ओरी (ओरहान अवत्रामणी) यानं दिली होती. त्यामुळे श्रुतीच्या लग्नाची बातमी चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. यावर आता श्रुतीने लग्नाविषयी खरं काय ते सांगितलं. श्रुतीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

श्रुतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तिनं लिहलं, 'तर मी विवाहित नाही आहे. आणि त्या व्यक्तीसाठी, जी  प्रत्येक गोष्टीबद्दल मोकळेपणाने बोलते, हे मी का लपवू? जे मला अजिबात ओळखत नाहीत, त्यांनी तर आधी  शांत व्हावं', असं म्हणत श्रुतीने या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय तिनं ओरीला टोमणा मारला. यापुर्वीही अनेकदा श्रुतीच्या लग्नाच्या अफवा पसरल्या आहेत. 

ओरीने Redditवरच्या 'आस्क मी एनिथिंग' सेशनमध्ये एका चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना,  शांतनू हा श्रुतीचा पती असल्याचं त्यानं म्हटलं होतं. ओरीच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. शांतनू हजारिका आणि श्रुती हसन यांनी गुपचूप लग्न केले की काय असा अंदाज सोशल मीडियावर चाहते लावत होते. अखेर श्रुतीने पोस्ट शेअर करत चर्चांना पूर्णविराम दिला.

श्रुती गेल्या काही काळापासून शांतनु हझारिकाला डेट करत आहे. शांतनू हजारिका हा एक डूडल कलाकार आहे. त्याने संगीत उद्योगातील रफ्तार, दिव्य, ऋत्विज सारख्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, श्रुती नुकतीच 'सालार' चित्रपटात दिसली. हा ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात श्रुतीशिवाय प्रभासने महत्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय तिचा हॉलिवूड चित्रपट 'द आय' देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रुतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

टॅग्स :श्रुती हसनसेलिब्रिटीलग्न