Join us

मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी दिसणार 'हाथी मेरे साथी' चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 18:01 IST

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने हाथी मेरे साथी चित्रपटाच्या आधी शाहरूखच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर व अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मिर्झापूर' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. श्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टचे अपडेट देत असते व फोटोदेखील शेअर करत असते. श्रिया लवकरच हाथी मेरे साथी या चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. ही माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

श्रियाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, हाथी मेरे साथी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. तीन भाषेत हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा भाग बनून मी स्वतःला खूप नशीबवान मानते. राणा दुग्गुबत्ती सेटवर विद्यार्थ्यासारखा होता स्टारसारखा नाही. असं चित्र फार क्वचित पहायला मिळतं. मी पहिल्यांदाच त्रिभाषीय सिनेमात काम करते आहे. हे खूप आव्हान होते आणि उत्साहीदेखील. या संधीसाठी मी खूप आभारी आहे. 

सुरूवातीला 'हाथी मेरे साथी' चित्रपटात श्रियाच्या जागी कल्कीची वर्णी लागली होती. श्रिया या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 

श्रियाने शाहरूख खानसोबत 'फॅन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट 'अभी तो पार्टी शुरू हुई है' आणि गुरींदर चड्ढाचा ब्रिटीश पीरिएड ड्रामा 'बीचम हाऊस'मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :श्रिया पिळगावकरसचिन पिळगांवकर