Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देवदास' वेळी संजय लीला भन्साळींना खोटं वय सांगितलं, श्रेया घोषालचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:47 IST

अनेक वर्षांनंतर श्रेया घोषालने सांगितला किस्सा

संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) अनेक सिनेमांपैकी एक मास्टरपीस म्हणजे 'देवदास'.  2002 साली सिनेमा रिलीज झाला. भन्साळींचा भव्यदिव्य सेट, यातील शाहरुख-ऐश्वर्याची केमिस्ट्री आणि महत्वाचं म्हणजे सिनेमातील गाणी यामुळे सिनेमा खूप गाजला. 'डोला रे डोला','बैरी पिया' अशी सगळीच गाणी गाजली. मधूर आवाज असलेली श्रेया घोषालने ही गाणी गायली होती. विशेष म्हणजे हा तिच्यासाठी पहिलाच ब्रेक होता. याच सिनेमातून तिने पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केलं आणि धुरळाच उडवला. विशेष म्हणजे त्यावेळी ती १६ वर्षांचीही नव्हती. याचा किस्सा श्रेयाने नुकताच सांगितला.

करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' पॉडकास्टमध्ये श्रेयाने हा किस्सा सांगितला. ती म्हणाली, "संजय भन्साळींच्या आई लीला यांनी माझे सा रे ग म प मधील एपिसोड्स बघितले होते. त्यांनी संजय सरांना माझं नाव सुचवलं होतं. तेव्हा संजय सर सुद्धा 'देवदास'साठी एका नव्या आवाजाच्या शोधात होते. तेव्हा मी १६ वर्षांची सुद्धा नव्हते. पण जेव्हा मी सरांना भेटले तेव्हा मी म्हटलं की मी १६ वर्षांची आहे. कारण मला माझं वय कमी आहे हे दाखवायचं नव्हतं. पण त्यांचा माझ्यावरचा विश्वास, मला काहीच अनुभवही नव्हता तरी त्यांनी मला ही संधी दिली यामुळेच हे झालं."

श्रेया घोषाल हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. तिने अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहे. संगीत क्षेत्रात येणाऱ्यांसाठी श्रेया ही खरोखरंच प्रेरणा आहे. आजही तिचा आवाज सर्वांना भुरळ घालतो. श्रेया घोषाल ४० वर्षांची असून एका मुलाची आई आहे. सध्या ती देशातील अनेक शहरांमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट्स करत आहे.

टॅग्स :श्रेया घोषालबॉलिवूडसंगीत