Join us

'ड्युप्लिकेट किआरा' आणि विकी कौशलचे खास क्षण; श्रेया बुगडेच्या पोस्टचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 09:03 IST

आगामी चित्रपट 'गोविंदा नाम मेरा 'च्या प्रमोशनसाठी विकीने चला हवा येऊ देऊ च्या सेट वर हजेरी लावली.

'चला हवा येऊ द्या' या शोमधले सर्वच कलाकार नेहमी धमाल मस्ती करत असतात. त्यात सेलिब्रिटींची मिमिक्री करणं, हुबेहुब नकला करणं या कलाकारांना फार छान जमतं. या कलाकारांमध्ये नेहमी उठुन दिसते ती सर्वांची लाडकी श्रेया बुगडे. श्रेया आपल्या अप्रतिम अभिनयाने नेहमी लक्ष वेधतेच. तर यावेळी तिनं ड्युप्लिकेट किआरा बनुन चक्क विकी कौशल सोबत रोमान्स केलाय. (chala hava yeu dya show)

आगामी चित्रपट 'गोविंदा नाम मेरा 'च्या प्रमोशनसाठी विकीने चला हवा येऊ देऊ च्या सेट वर हजेरी लावली. यामध्ये विकी सोबत किआरा अडवणी दिसणार आहे. यावेळी सर्व कलाकारांनी जो स्किट सादर केला त्यात श्रेया किआरा बनली होती. विकी सोबतचा एक डान्स व्हिडिओ श्रेयाने पोस्ट केला आहे. 'किआरा डुप्लिकेट असली तरी विकी कौशल खरा आहे' असे तिने कॅप्शन दिले आहे.

Ved Marathi Movie : रितेश जेनेलियाचं संगीत क्षेत्रात पाऊल, 'देश म्युझिक'वर वेड लावायला येतंय 'बेसुरी

विकी कौशलने सुद्धा चला हवा येऊ द्या मध्ये धमाल केलेली बघायला मिळते. कलाकारांचा विनोदी अभिनय बघुन विकी सुद्धा पोट धरुन हसलाय.

गोविंदा नाम मेरा हा चित्रपट करण जोहरने निर्मित केला असून विकी कौशल पहिल्यांदाच करण जोहर सोबत काम करत आहे. तर शशांक खेतान यांनी दिग्दर्शन केले आहे. १६ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याश्रेया बुगडेविकी कौशल