Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा कपूरने शेअर केला 'इन्नी सोनी' गाण्यातील लूक, दिसतेय खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 17:56 IST

बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूर हिने इंस्टाग्रामवर रेड गाऊनमधील काही फोटो शेअर केले आणि तिने आगामी चित्रपट 'साहो'चा फर्स्ट लूक सांगितला. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.

श्रद्धा कपूर आगामी चित्रपट 'साहो'मुळे व्यग्र आहे. सध्या ती 'बाहुबली' फेम प्रभाससोबतसाहोच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. श्रद्धा या चित्रपटातील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती लाल रंगाच्या गाऊनमध्ये खूप ग्लॅमरस व सुंदर दिसते आहे. 

श्रद्धा कपूरने आगामी चित्रपट साहोमधील 'इन्नी सोनी' या गाण्यातील लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती लाल रंगाच्या गाऊनमध्ये खूपच छान दिसते आहे. 

नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्सनुसार प्रभासने 'साहो' चित्रपटासाठी जास्त रक्कम घेतली असून सिनेइंडस्ट्रीतील सर्वात महागड्या कलाकारांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे.

असंदेखील ऐकायला मिळालं की प्रभास साहोच्या प्री रिलीज बिझनेसमधीलदेखील पन्नास टक्के हिस्सा घेणार आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. या चित्रपटातून श्रद्धा कपूर दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. तिला या चित्रपटासाठी ७ कोटी मानधन देण्यात आल्याचं समजतं आहे. 

साहो हिंदी शिवाय तमीळ व तेलगू भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात प्रभास व श्रद्धा शिवाय जॅकी श्रॉफ व चंकी पांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हा चित्रपट ३० ऑगस्ट, २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूरप्रभाससाहोजॅकी श्रॉफ