Join us
Daily Top 2Weekly Top 5

"किती गोड..", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतच्या व्हिडीओवर श्रद्धा कपूरची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 10:26 IST

ओंकार राऊतच्या व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने केलेली कमेंट चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय शो आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो पाहिला जातो. या शोचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेप्रमाणेच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या शोमुळे समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, नम्रता संभेराव या कलाकारांच्या चाहत्यांमध्ये भर पडली. तर गौरव मोरे, ओंकार राऊत, दत्तू मोरे, शिवाली परब, पृथ्विक प्रताप, प्रियदर्शिनी इंदलकर हे नवे चेहरे घराघरात पोहोचले. हास्यजत्रेतील सगळेच विनोदवीर अफलातून अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. यातील विनोदवीर ओंकार राऊत सध्या चर्चेत आला आहे. 

 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही वेळ विश्रांती घेतली होती. पण सोमवारपासून पुन्हा या शोचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर ओंकार राऊत चर्चेत आला आहे. ओंकारच्या एका व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने कमेंट केली आहे.

एका मुलाखतीत ओंकार राऊत श्रद्धा कपूरसाठी गाणं गाताना दिसतोय. या व्हिडिओत पृथ्वीक प्रताप ओंकारला श्रद्धा कपूरसाठी एखादं गाणं गाण्याची विनंती करताना दिसतोय. यानंतर ओंकार श्रद्धाच्या आशिकी २ या सिनेमातलं 'चाहू मैं या ना' हे गाणं गातो. गाणं संपल्यानंतर श्रद्धा कपूरपर्यंत हे गाणं पोहोचले अशी आशा तो व्यक्त करतो. ओंकारनं गायलेल्या हे गाणं नेटकऱ्यांनाही आवडलंय. तसेच जिच्यासाठी हे गाणं गायलं त्या चुलबुली गर्ल श्रद्धा कपूरनेही यावर कमेंट केली. 

श्रद्धाने ओंकारच्या या व्हिडीओवर 'वॉव सुपर हा..किती गोड…मस्त' म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. श्रद्धा कपूरने केलेल्या या कमेंटनंतर ओंकार राऊतचा आनंद नक्कीच गगनात मावत नसेल हे नक्की. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राश्रद्धा कपूर