Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या शूटिंगला लागला ब्रेक, या कलाकाराला झाली कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 18:53 IST

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेचे चित्रीकरण थांबवावे लागले आहे.  

कोरोना व्हायरसमुळे जवळपास तीन महिने मालिका व चित्रपटांचे शूटिंग थांबले होते. मात्र आता काही नियम आणि अटींसोबत शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. भलेही शूटिंगला सुरूवात झाली असली तरीदेखील कोरोनाचे सावट अद्याप आहेच. त्यात आता शूटिंग दरम्यान अनेकांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे शूटिंग थांबवावे लागत आहे. दरम्यान आता ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेच्या शूटिंगलादेखील ब्रेक लागला आहे. या मालिकेतील अभिनेते सचिन त्यागी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासोबत क्रू मेंबर्सही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार,  ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेचे शूटिंग सोमवारी सकाळी दहा वाजता फिल्मसिटी येथे होत होते. त्यावेळी सचिन त्यागी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. सचिन त्यागी मालिकेत कार्तिकचे वडील मनीष गोयंकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह काही क्रू मेंबर्सचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सचिन यांना ताप होता त्यामुळे त्यांनी आपली कोरोना टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. याशिवाय इतर क्रू मेंबर्समध्येही लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनीही आपली टेस्ट केली. त्यापैकी काही जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर काही जणांचा निगेटिव्ह आहे. इतर मेंबर्सचीही टेस्ट करण्यात आली आहे, त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

यापूर्वी कसौटी जिंदगी की आणि भाकरवडी मालिकेचे शूटिंगही कोरोनामुळे थांबले होते. कसौटी जिंदगी कीमधील मुख्य अभिनेता पार्थ समथानला मालिकेचे शूटिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसातच कोरोना झाला होता. तर भाकरवडी मालिकेचा क्रू मेंबरचा गेल्या महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता है