Join us

धक्कादायक! अनुपम खेर यांचं ऑफिस फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांवर मारला डल्ला, व्हिडीओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 08:50 IST

अनुपम खेर यांच्या घरी चोरी झाली असून चोरट्यांनी मोठी रक्कम लंपास केली आहे (anupam kher)

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे अनुपम खेर.अनुपम खेर यांच्याविषयी धक्कादायक माहिती समोर येतेय. अनुपम यांच्या ऑफिसमध्ये चोरीची घटना घडली असून याविषयी सविस्तर माहिती अनुपम यांनी ट्विटरवर दिली आहे. अनुपम खेर यांचं ऑफिस फोडून चोरांनी तब्बल ४ लाखांपेक्षा अधिक रक्कम पळवली आहे. याविषयीचा व्हिडीओ शेअर करत अनुपम यांनी सर्वांना या घटनेविषयी सांगितलंय.

अनुपम खेर यांच्या घरुन चोरी

अनुपम खेर यांनी चोरांनी ऑफिसमध्ये जी तोडफोड करुन नुकसान केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. अनुपम खेर लिहितात, "काल रात्री वीरा देसाई रोडवरील माझ्या कार्यालयात दोन चोरट्यांनी माझ्या कार्यालयाचे दोन दरवाजे तोडून अकाऊंट विभागातील संपूर्ण तिजोरी (जी कदाचित त्यांना तोडता आली नसावी) आणि आमच्या कंपनीने बनवलेल्या चित्रपटाचे निगेटिव्ह बॉक्स चोरून नेले. आमच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. ऑफिस स्टाफने याविषयी FIR नोंदवला आहे. लवकरच चोरांना आम्ही अटक करु, असं पोलिसांनी आश्वासन दिलंय. CCTV मध्ये दोन चोर सामान घेऊन ऑटोमध्ये बसलेले दिसत आहेत. देव या चोरांना सद्बुद्धी देवो. पोलीस यायच्या आधी हा व्हिडीओ माझ्या ऑफिस स्टाफने शूट केलाय."

 

अनुपम खेर यांचं मोठं नुकसान

पोलिसांनी केलेल्या रिपोर्टनुसार अनुपम खेर यांच्या ऑफिसमधून काही रोकड चोरट्यांनी लंपास केली. याशिवाय तब्बल ४.२५ लाखांचं सामान चोरांनी पळवलं. चोरांनी जे सामान चोरलं त्यात पैसे असतील अशी त्यांची कल्पना असावी. पण त्यात 'मैने गांधी को क्यू मारा' सिनेमाच्या रीळा होत्या. अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये डल्ला मारणारे चोर लवकरच तुरुंगात असतील, असं पोलिसांनी आश्वासन दिलंय. 

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडचोरी