Television: छोट्या पडद्यावरील सावळ्याची जणू सावली ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. शिवाय सारंग-सावलीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.या मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे कथानक आणखी रंजक बनत चाललं आहे. अशातच आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया...
दरम्यान, 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका तिच्या कथानकमुळे कायम मालिका रसिकांमध्ये चर्चेत असते. मालिकेत भैरवी ही सावली आणि मेहेंदळे कुटुंबाला त्रास देण्यासाठी नेहमीच काही ना काही कारस्थान रचत असते. मात्र, सावली मोठ्या हुशारीने तिचे हे डाव हाणून पाडते. नुकताच सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे. ऐन होळीच्या आनंदाची दिवशी भैरवी मनात सुडाची भावना होलीका दहनाच्या कार्यक्रमात सहभागी होते. आणि सावलीकडे बघत म्हणते की, या होलिका दहनात आता तुझंही दहन करणार... असं म्हणत सावलीला जोरात धक्का मारते. मात्र, सावलीचा धक्का हा तिच्या पुढे उभी असलेल्या ताराला आणि ताराच्या पायाला आगीचे चटके बसतात. याच दरम्यान, मालिकेत नव्या पाहुणीची एन्ट्री होते. ही अभिनेत्री म्हणजे मानसी सुरेश आहे.
अभिनेत्री मानसी सुरेश अलिकडेच शिवा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत तिने किर्ती नावाची भूमिका साकारली होती. स्वभावाने स्वार्थी आणि शिवाला त्रास देणारी अशी तिची भूमिका होती.
Web Summary : Popular actress Manasi Suresh joins 'Savalayachi Janoo Savali' as the plot thickens. Bhairavi attempts to harm Savli during Holika Dahan, but Tara gets hurt instead. Manasi Suresh, known for her role in 'Shiva', will bring a new twist to the show.
Web Summary : लोकप्रिय अभिनेत्री मानसी सुरेश 'सावळ्याची जणू सावली' में शामिल हो गई हैं, जिससे कहानी और भी रोमांचक हो गई है। भैरवी होलिका दहन के दौरान सावली को नुकसान पहुंचाने की कोशिश करती है, लेकिन तारा घायल हो जाती है। 'शिवा' में अपनी भूमिका के लिए जानी जाने वाली मानसी सुरेश शो में एक नया मोड़ लाएंगी।