Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss विजेतेपदाचं बक्षिस 25 लाख रुपये, याचे अर्धेही मिळाले नाहीत; शिव ठाकरेचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 09:23 IST

शिव ठाकरे बिग बॉसचा विजेता ठरला तेव्हा त्याला बक्षिसाच्या ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे मिळाले असा त्याने नुकताच खुलासा केला. 

अमरावतीचा वाघ शिव ठाकरे (Shiv Thakre) त्याच्या साधेपणामुळे ओळखला जातो. 'बिग बॉस'मराठीचा विजेता झाल्यानंतरही त्याला कोणताच अॅटिट्यूड नाही. चाहत्यांशी तो आपुलकीने संवाद साधतो. मराठीच नाही तर हिंदी इंडस्ट्रीतही त्याने अनेक मित्र बनवले आहेत. सर्वांच्या अडीअडचणीला धावून जाणारा असा तो मित्र आहे. शिव ठाकरे बिग बॉसचा विजेता ठरला तेव्हा त्याला बक्षिसाच्या ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे मिळाले असा त्याने नुकताच खुलासा केला. 

शिव ठाकरेने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंहच्या पॉकास्टमध्ये हजेरी लावली. तो म्हणाला, "शोच्या बक्षिसाची किंमत रोख 25 लाख रुपये होती. पण मला त्याचे अर्धेही मिळाले नाहीत. फिनालेच्या काही तास आधी निर्मात्यांनी ट्विस्ट आणला आणि बक्षिसाची रक्कम आठ लाखांनी कमी म्हणजेच १७ लाख झाली. बरं हे १७ लाखही पूर्ण नाहीच मिळाले. त्यातूनही मला केवळ ११.५ लाख रुपयेच मिळाले. यामध्ये कुटुंबियांचं विमानप्रवासाचं तिकीट आणि कॉस्च्युम होतं."

शिव ठाकरे बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता ठरला होता. त्याची फॅन फॉलोइंग तेव्हापासूनच जबरदस्त होती. यानंतर त्याला हिंदी बिग बॉसचीही ऑफर मिळाली. इथेही तो रनर अप होता. सलमान खानही त्याच्यामुळे प्रभावित झाला. यानंतर 'झलक दिखला जा', 'खतरो के खिलाडी' असे एकामागोमाग एक रिएलिटी शोमध्ये त्याने भाग घेतला. बिग बॉसच्या आधी तो 'रोडिज'मुळे प्रसिद्धीझोतात आला होता.

टॅग्स :शीव ठाकरेबिग बॉस मराठीमराठी अभिनेतासेलिब्रिटी