Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिव ठाकरेचं भन्नाट प्री-बर्थडे सेलिब्रेशन, लहान मुलांसोबत वाढदिवस दणक्यात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 18:32 IST

शिवला डोंबिवलीतील त्यांच्या शाळेनं एक खास प्री-बर्थडे सरप्राईज दिलं. 

 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. शिव त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या स्वभावामुळेही ओळखला जातो. त्याचे लाखो चाहते आहेत. उद्या शिव ठाकरेचा वाढदिवस आहे. पण वाढदिवसाआधीच सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. शिवला डोंबिवलीतील त्यांच्या शाळेनं एक खास प्री-बर्थडे सरप्राईज दिलं. 

डोंबिवलीतील जन गण मन या शाळेतं शिव ठाकरेचं  2000 मुलांसोबत प्री-बर्थडे सेलिब्रेशन दणक्यात झालयं. शिव ठाकरेनं त्यांच्या इन्स्टाग्रामवर प्री-बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या क‌ॅप्शनमध्ये त्याने लिहलं की, "इतक्या सुंदर प्री-बर्थडे सरप्राईजने भारावून गेलो. या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार". या व्हिडीओत लहान मुलांनी शिवच्या चेहऱ्याचे मुखवटे लावले होते. 

शिवाय, शिव ठाकरेनं 'खतरों के खिलाडी 13' मधील अरिजित तनेजा, अंजली दिनेश आनंद आणि अंजुम फकीह या मित्रांसह प्री-बर्थडे सेलिब्रेशन केलं. 

शिव ठाकरेचा जन्म ९ सप्टेंबर रोजी अमरावतीमध्ये झाला. शिवचं त्याच्या कुटुंबीयांबरोबर अगदी जवळचं नातं आहे. अनेक मुलाखतींतूनही त्याने अनेकदा त्याच्या कुटुंबीयांबरोबर असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. शिव सोशल मीडियावरही त्याच्या फॅमिलीबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.

टॅग्स :शीव ठाकरेबॉलिवूड