Join us

'तुला पाहते रे' फेम शिल्पा तुळसकरने शेअर केला फॅमिली फोटो, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 06:30 IST

शिल्पा तुळसकर हिने आतापर्यंत अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री शिल्पा तुळसकर हिने आतापर्यंत अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे.

शिल्पाने आजवर पलछीन, दिल मिल गये, संजीवनी, लेडीज स्पेशल यांसारख्या अनेक मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

डोंबिवली फास्ट, सनई चौघडे, शुगर सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या चित्रपटांतील शिल्पाच्या भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या आहेत.

मागील वर्षात छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका तुला पाहते रे मध्ये शिल्पा तुळसकर झळकली होती. या मालिकेत तिने राजनंदिनीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. 

शिल्पाचे लग्न विशाल शेट्टीसोबत झाले असून विवान आणि शैवा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.

विशाल हा हॉटेल बिझनेस मध्ये असून शिल्पाच्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये ती अनेकवेळी तिच्या पतीसोबतचे फोटो पोस्ट करते.

शिल्पाचा पती हा हँडसम असून त्यांची जोडी शिल्पाच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

शिल्पा आणि विशाल यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री असून ती त्यांच्या फोटोंमधून देखील आपल्याला पाहायला मिळते.

टॅग्स :तुला पाहते रेपरिवार