Join us

VIDEO : झाडाला लागलेले सफरचंद पाहून लहान मुलीसारखी उड्या मारू लागली शिल्पा शेट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 16:29 IST

मनालीतील काही व्हिडीओज शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. एका व्हिडीओत शिल्पा दूरूनच सफरचंदाचं झाड पाहून आनंदाने नाचू लागली आहे.

शिल्पा शेट्टीचा मनालीतील व्हिडीओ सोशल मीडियावर बऱ्याच लोकांना आवडला आहे. शिल्पा शेट्टी साधारण १३ वर्षांच्या लांबलचक ब्रेकनंतर 'हंगामा 2' सिनेमातून पुन्हा रूपेरी पडद्यावर वापसी करत आहे. या सिनेमाच्या शूटींगसाठी शिल्पा मनालीमध्ये होती. इथे तिने शूटींगसोबतच खूप एन्जॉयही केलं.

मनालीतील काही व्हिडीओज शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. एका व्हिडीओत शिल्पा दूरूनच सफदचंदाचं झाड पाहून आनंदाने नाचू लागली आहे. ती सफचंदाच्या झाडाकडे धावत जाते. आणि जेव्हा ती त्या सफरचंदाच्या झाडाजवळ पोहोचते तेव्हा ती झाडाला लागलेली सफरचंद पाहून आनंदाने भारावून जाते.

याच व्हिडीओत ती झाडाला लागलेले सफरचंद पाहून लहान मुलींसारखी उड्या मारू लागते. नाचू लागते. यात म्हणताना दिसते की, ए फॉर अ‍ॅपल, बी फॉर बडे अ‍ॅपल, सी फॉर छोटे अ‍ॅपल. झाडांवर वेगवेगळ्या साइजचे अ‍ॅपल आहेत. खाली जमिनीवर पडलेले अ‍ॅपल पाहूनही ती भारावून जाते. 

खाली पडलेले अ‍ॅपल पाहून ती गमतीने म्हणताना दिसते की, बटाट्याच्या भावात विकले जात आहेत अ‍ॅपल. अखेर ती स्वत:ला रोखू शकत नाही आणि झाडाचं एक सफरचंद तोडून खाऊ लागते. सोबतच आणखी एका फळाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. हे फळ रिझॉर्टच्या स्टाफने तिला तोडण्याचीही परवानगी दिली. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूड