Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:07 IST

शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्री हिमांशी खुराना हिने पोस्ट शेअर केली आहे. हिमांशीने शेफालीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शेफालीच्या निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

Shefali Jariwali Death: 'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने २७ जून(शुक्रवारी) शेफालीची प्राणज्योत मालवली. तिच्या अकस्मात निधनाने चाहते, कुटुंबीय आणि सिनेसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच शेफालीचा हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. 

शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्री हिमांशी खुराना हिने पोस्ट शेअर केली आहे. हिमांशीने शेफालीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शेफालीच्या निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. ही स्टोरी शेअर करत हिमांशीने बिग बॉस शापित असल्याचं म्हटलं आहे. "बिग बॉस-मला वाटतं ती जागाच शापित आहे", असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे. 

'काटा लगा' या गाण्यामुळे शेफालीला प्रसिद्धी मिळाली होती. तिने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं होतं. वेबसीरिजमध्ये शेफाली दिसली होती. 'बिग बॉस १३'मध्येही ती सहभागी झाली होती. शेफालीने अभिनेता पराग त्यागी याच्याशी २०१४ मध्ये लग्न केलं होतं. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. मात्र, तिच्या अचानक झालेल्या निधनाने पराग आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

टॅग्स :शेफाली जरीवालाहृदयविकाराचा झटकाबिग बॉसमृत्यू