Join us
Daily Top 2Weekly Top 5

जावयाला मारली मिठी अन् सर्वांना केलं 'खामोश'! शत्रुघ्न सिन्हा यांचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 09:29 IST

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाविषयी तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा नाराज आहेत असं बोललं जात होतं. पण समोर आलेला व्हिडीओ पाहून या सर्व चर्चा बंद झाल्यात (sonakshi sinha, shatrughna sinha)

सध्या जिकडेतिकडे एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे सोनाक्षी सिन्हाच्यालग्नाची. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षीच्या लग्नाला धरुन वडील शत्रुघ्न सिन्हा आणि संपूर्ण सिन्हा कुटुंब नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. पण नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत शत्रुघ्न सिन्हा जावयाला मिठी मारताना आणि त्याच्याशी हसतखेळत बोलताना दिसत आहेत. त्यामुळे नाराजीच्या सर्व अफवांना शत्रुघ्न सिन्हांनी या कृतीतून 'खामोश' केलंय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

जावयाला शत्रुघ्न सिन्हांनी मारली मिठी

काल रात्री सोनाक्षीचा होणारा पती जहीर इक्बालच्या घरी संपूर्ण सिन्हा कुटुंब उपस्थित होतं. त्यावेळी लाडक्या जावयाची शत्रुघ्न सिन्हांनी भेट घेतली. या भेटीचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. झालं असं की.. शत्रुघ्न आणि झहीर या दोघांनीही पापाराझींसमोर एकमेकांना मिठी मारली आणि फोटोशूटसाठी पोज दिली. जावयासोबत शत्रुघ्न खूप आनंदी दिसत होते. पापाराझींनी केलेल्या विनंतीवर त्यांनी 'खामोश' देखील म्हटलं. या खास व्हिडीओवर सर्वांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय.

सिन्हा कुटुंब जहीरच्या घरी

काल रात्री सोनाक्षी आणि तिचे आई-वडील शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा देखील झहीरच्या घरी दिसले. झहीरसोबतच्या अचानक लग्नामुळे सोनाक्षीचं कुटुंब नाराज असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. यापूर्वी शत्रुघ्न यांनी लेकीच्या लग्नात उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले होते, "मी लग्नाला नक्की उपस्थित राहीन. मी लग्नाला का नसणार? त्यांचा आनंद हाच माझा आनंद आहे. त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा मलाही अधिकार आहे. त्यांना त्यांचा जोडीदार निवडण्याचा आणि त्यांच्या वैवाहिक जीवनातील इतर गोष्टींचा पूर्ण अधिकार आहे. मी त्यांच्यामागे कवच बनून ठामपणे उभा आहे."

टॅग्स :सोनाक्षी सिन्हालग्नशत्रुघ्न सिन्हा