Join us  

Shalin On Dalljiet: एक्स-वाईफ दलजीत कौरच्या दुसऱ्या लग्नावर शालिन भानोटने असं केलं रिअ‍ॅक्ट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 6:45 PM

शालीन भनोट 'बिग बॉस 16'मध्ये असताना त्याची एक्स वाईफ दलजीत कौरचा साखरपुडा झाला होता.

'कुलवधू' फेम अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) लवकरच दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्रीचं पहिलं लग्न अवघ्या 4 वर्षातच मोडलं होते. तिचा पहिला पती लग्न शालिन भानोतसोबत वाईट वळणावर संपलं होतं. माजी पत्नी दलजीत कौरच्या दुसऱ्या लग्नावर शालीन भानोटने प्रतिक्रिया दिली आहे. 

दलजीत कौर 18 मार्च 2023 रोजी केनियातील रहिवासी निखिल पटेल(Nikhil Patel)सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. निखिल पटेल हे दोन मुलींचे वडीलही आहेत. दलजीत दुसऱ्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. शालीन भानोटही आपल्या एक्स पत्नीच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश आहे. इंडिया टुडेशी संवाद साधताना शालीनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या माजी पत्नीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेता म्हणाला, “मी तिला शुभेच्छा देतो. मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे.त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवातीसाठी मी प्रार्थना करत आहे.

गेल्या वर्षी दुबईत मित्राच्या पार्टीत दलजीत पहिल्यांदा निकला भेटली होती. त्या काळात दोघेही फक्त मुलांबद्दल बोलायचे आणि कुणाच्याही मनात प्रेमाची भावना नव्हती. दोघेही काळाच्या ओघात प्रेमात पडले. जवळपास एक वर्ष निखिलसोबत रिलेशनशिपमध्ये दिलजीतने लग्नाचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीचे यापूर्वी शालीन भनोटसोबत लग्न झाले होते. 2009 मध्ये दोघांचे लग्न झाले होते, मात्र त्यानंतर लगेचच दलजीत आणि शालीन यांच्यात भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या. हे भांडण इतके वाढले की अखेर 2013 मध्ये दोघांनी आपले मार्ग वेगळे केले. 

टॅग्स :दलजीत कौरटिव्ही कलाकार