Join us

शक्ती कपूर सकाळी ९ वाजता जागे झाले अन् बातमी धडकली; सिद्धांतच्या ड्रग प्रकरणावर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 11:37 IST

Siddhanth Kapoor Rave Party Drug Case: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे तर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर देखील एनसीबीच्या रडारवर आली होती.

बॉलिवूड सेलिब्रेटी आणि ड्रग्ज यांचे कनेक्शन आज पुन्हा एकदा समोर आले आहे. अभिनेता सुशांत सिंह रजपूत, आर्यन खान यांच्या कथित ड्रग प्रकरणानंतर दिग्गज अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर बंगळुरु पोलिसांच्या ताब्यात गेला आहे. रेव्ह पार्टीवर ड्रग सेवन केल्याचे छाप्यामध्ये समोर आले आहे. यावर शक्ती कपूर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. 

बंगळुरूच्या एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरु होती. या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा मारला. यानंतर सिद्धांत कपूरला ताब्यात घेण्यात आले. चाचणीमध्ये सिद्धांत कपूरसह सहा जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे समोर आले आहे. सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे तर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर देखील एनसीबीच्या रडारवर आली होती. या संदर्भात एनसीबीच्या टीमने श्रद्धा कपूरचीही चौकशी केली होती. 

आता सिद्धांत कपूरला बंगळुरुच्या उल्सूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर शक्ती कपूर यांनी आज तकला प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धांतला ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची आपल्याला माहिती नव्हती. मी सकाळी ९ वाजता झोपेतून उठलो तेव्हा बातम्यांमधून मला समजले. मला काहीच कल्पना नाहीय, असे शक्ती कपूर म्हणाले. 

मला काय चाललेय काहीच कळत नाहीय. माझे सर्व कुटुंबीय त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू कोणीच फोन उचलत नाहीय, असेही शक्ती कपूर म्हणाले. 

टॅग्स :शक्ती कपूरपोलिसअमली पदार्थश्रद्धा कपूर