Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कभी खुशी कभी गम'मधील हेलिकॉप्टर एन्ट्रीचा सीन गाजला पण शाहरुख होता नाराज कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 11:21 IST

शाहरुख खान 'कभी खुशी कभी गम'च्या हेलिकॉप्टर एन्ट्री सीनवर का नाराज होता? जाणून घ्या

आजही कौटुंबिक सिनेमा कोणता असं कोणी विचारलं तर काही मोजक्या सिनेमांपैकी 'कभी खुशी कभी गम' सिनेमाचं नाव लिस्टमध्ये हमखास येईलच यात शंका नाही.  'कभी खुशी कभी गम' सिनेमा आजही टीव्हीवर लागला की सहकुटुंब सहपरिवार या सिनेमाचा आस्वाद घेतला जातो. 'कभी खुशी कभी गम'मध्ये शाहरुख खान, हृतिक रोशन, करीना कपूर, अमिताभ - जया बच्चन असे एकापेक्षा एक कलाकार होते. त्यापैकी शाहरुख खानच्या एन्ट्री सीनची चांगलीच चर्चा झाली. पण हा आयकॉनिक सीन करताना शाहरुख मात्र चांगलाच नाराज होता. 

शाहरुख हेलिकॉप्टर एन्ट्री सीनच्या वेळी नाराज झालेला कारण...

साइरस सेजसोबत मुलाखतीतमध्ये गप्पा मारताना निखिल अडवाणींनी हा खुलासा केला होता. निखिल म्हणाला, "मी शाहरुखला कभी खुशी कभी गमच्या एन्ट्री सीनबद्दल सांगितलं. हेलिकॉप्टरमधून त्याला एन्ट्री करायची होती. परंतु हे ऐकताच शाहरुख नाराज झाला होता. शाहरुखला वाटलेलं की, त्याला चालत्या हेलिकॉप्टरमधून उडी मारायची असेल. परंतु त्याला फक्त हेलिकॉप्टरमधून उतरायचं होतं. त्यामुळे शाहरुख नाराज झाला होता."

निखिल अडवाणी पुढे म्हणाले की, "हा सीन शाहरुखपेक्षा जया बच्चन यांचा जास्त होता. जेव्हा शाहरुखचे पाय जमिनीवर पडतात तेव्हा जया बच्चन यांना मुलाच्या येण्याचा अंदाज येतो. शाहरुखला वाटलेलं त्याची एन्ट्री ग्रँड असेल पण तसं काही झालं नाही." अशाप्रकारे निखिल अडवाणींनी शाहरुखबद्दल हा खुलासा केला. 'कभी खुशी कभी गम' सिनेमातील हा सीन आजही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट सीनपैकी ओळखला जातो. शाहरुख सध्या त्याच्या आगामी 'किंग' सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

टॅग्स :शाहरुख खानअमिताभ बच्चननिखिल अडवाणीजया बच्चन